श्रीगोंदा उपनगराध्यक्षपदाची निवड करा;...अन्यथा १५ आॅगस्टला उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 10:33 AM2020-08-08T10:33:25+5:302020-08-08T10:33:59+5:30

श्रीगोंदा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अशोक खेंडके यांनी एक महिन्यापूर्वी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र जिल्हाधिकाºयांंनी कोरोनाच्या नावाखाली उपनगराध्यक्षपदाची निवड करण्यास टाळाटाळ चालविली आहे. या विरोधात भाजपाच्या चार नगरसेवकांनी १५ आॅगस्ट रोजी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

Choose the post of Shrigonda Deputy Mayor; ... otherwise fast on 15th August | श्रीगोंदा उपनगराध्यक्षपदाची निवड करा;...अन्यथा १५ आॅगस्टला उपोषण

श्रीगोंदा उपनगराध्यक्षपदाची निवड करा;...अन्यथा १५ आॅगस्टला उपोषण

श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अशोक खेंडके यांनी एक महिन्यापूर्वी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र जिल्हाधिकाºयांंनी कोरोनाच्या नावाखाली उपनगराध्यक्षपदाची निवड करण्यास टाळाटाळ चालविली आहे. या विरोधात भाजपाच्या चार नगरसेवकांनी १५ आॅगस्ट रोजी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

      जिल्हाधिकारी डॉ. राहुल द्विवेदी यांना  शुक्रवारी याबाबत निवेदन देण्यात आले. निवेदनावर अशोक खेंडके, शहाजी खेतमाळीस, रमेश लाढाणे, संग्राम घोडके या नगरसेवकांच्या सह्या आहेत.

नगर जिल्ह्यात कोरोनाच्या काळात सरपंच, पंचायत समिती सभापती उपसभापतीच्या निवडी होत आहेत. अहमदनगर महानगरपालिकेत स्थायी समिती सदस्यांच्या निवडी झाल्या. नाशीक जिल्ह्यातील नांदगाव, सिन्नर, नगरपालिका उपनगराध्यक्षपदासाठी निवड झाली. श्रीगोंदा नगरपालिकेत अवघे १९ नगरसेवक आहेत. त्यामुळे गर्दी होण्याचा प्रश्नच येत नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी श्रीगोंदा नगरपालिका उपनगराध्यक्षपदासाठी निवड  कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणीही या चार नगरसेवकांनी केली आहे. 

Web Title: Choose the post of Shrigonda Deputy Mayor; ... otherwise fast on 15th August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.