अक्षतांऐवजी नवरदेवाला मिळाला चोप : राहुरीतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 07:23 PM2019-01-09T19:23:09+5:302019-01-09T19:24:42+5:30

रविवारी हळदी समारंभ अगदी आनंदात पार पडला.

Chop of Navarwala instead of Akshata: Rahuri type | अक्षतांऐवजी नवरदेवाला मिळाला चोप : राहुरीतील प्रकार

अक्षतांऐवजी नवरदेवाला मिळाला चोप : राहुरीतील प्रकार

ठळक मुद्देमुलगी पसंत नसल्याची लग्न मुहूर्ताच्या अर्धा तास आधी उपरती

राहुरी : रविवारी हळदी समारंभ अगदी आनंदात पार पडला.. सोमवारी लग्नसोहळा पार पाडण्यासाठी वधू व वर दोन्हींकडील मंडळी जोरदार तयारी करत होते.. सर्व आवराआवर झाली.. अक्षता वाटपही झाले.. अन् लग्नघटिकेला अर्धा तास शिल्लक असतानाच नवरदेवाला मुलगी पसंत नसल्याची उपरती झाली.. नवरदेवाच्या बोहल्यावर उभे न राहण्याच्या पवित्र्याने लग्नमंडपातील नातेवाईकांची एकच धांदल उडाली.. अनेकांनी समजूत घालण्याचा प्रयत्न करूनही नवरदेव त्याच्या निर्णयावर ठाम राहिल्याने त्याला नातेवाईकांनी चांगलाच चोप दिला. त्यामुळे नरवदेवाच्या अंगावर अक्षता पडण्याऐवजी त्याला मार खावा लागला.
ही घटना राहुरी शहरातील एका मंगल कार्यालयात सोमवारी (दि.७) दुपारी घडली. नगर तालुक्यातील बायजाबाई जेऊर येथील एका मुलाचा राहुरी येथील एका मुलीशी सर्व नातेवाईकांच्या संमतीने मुलगा व मुलीच्या पसंतीने विवाह जमला होता. रविवारी (दि.६) सायंकाळी राहुरी येथे विवाहस्थळी हळदी समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. सोमवारी (दि.७) दुपारी राहुरी शहरातील रेल्वे स्टेशन रोड लगत आयटीआय कॉलेजजवळ हा विवाह सोहळा होता. लग्नाची सर्व तयारीही झाली होती. लग्न लागायला केवळ अर्धा तास वेळ शिल्लक होता. नवरदेवाने अचानक गर्जना करत मला मुलगी पसंत नाही, असे म्हणत लग्नाला साफ नकार दिला. यावेळी काही नातेवाईकांनी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्याने न ऐकल्याने अखेर संतप्त झालेल्या नवरीकडील लोकांनी नवरदेवाला एका खोलीत डांबून चांगलेच बदडून काढले. मात्र नवरदेव आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने लोकांनी त्याला व त्याच्या आई-वडिलांना राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. नवरदेवाने लग्नाला नकार का दिला हे मात्र समजू शकले नाही. ऐनवेळी लग्नास नकार देणाऱ्या जेऊर येथील नवरदेवाचे आठ ते दहा दिवसांपूर्वी लग्न जमले होते. ते लग्न का मोडले होते हेदेखील गुलदस्त्यातच राहिले आहे. आठ ते दहा दिवसात त्याच्या आई-वडिलांनी राहुरी येथील मुलगी पाहून दुसरे लग्न जमवले होते. मात्र लग्न सोहळ्याच्या अर्धा तास अगोदर मुलाने लग्नाला नकार दिला.

 

Web Title: Chop of Navarwala instead of Akshata: Rahuri type

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.