लिंपणगावमध्ये सरपंच-उपसरपंचपदासाठी चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:18 AM2021-02-08T04:18:16+5:302021-02-08T04:18:16+5:30
श्रीगोंदा : तालुक्यातील लिंपणगाव ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंचपदासाठी अनेक दिग्गजांनी फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे कमालीची चुरस निर्माण झाली ...
श्रीगोंदा : तालुक्यातील लिंपणगाव ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंचपदासाठी अनेक दिग्गजांनी फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे कमालीची चुरस निर्माण झाली आहे. कोण सरपंच- उपसरपंच होणार याकडे लक्ष लागले आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आमदार बबनराव पाचपुते गटाचे ११, तर नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे गटाचे ६ सदस्य निवडून आले आहेत. सरपंचपदासाठी सुरेखा जंगले, शोभा कोकाटे, समिक ठोमसकर, तर उपसरपंचपदासाठी विशाल कुरूमकर, विपुल रोडे इच्छुक आहेत. उपसरपंचपदासाठी रोडे व कुरूमकर यांच्यात एकमत न झाल्यास सुदाम पवार यांना ऐनवेळी संधी मिळू शकते.
गावपातळीवर नाव निश्चित झाले नाही, तर हा तिढा पाचपुते यांच्याकडे जाणार आहे. पाचपुते कुणाच्या नावाला हिरवा कंदील दाखवितात. यावरच सरपंच, उपसरपंचपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, हे ठरेल.