‘बनावट दारू रॅकेटची सीआयडी चौकशी करा’
By Admin | Published: April 10, 2017 03:44 AM2017-04-10T03:44:51+5:302017-04-10T03:44:51+5:30
विषारी दारूमुळे नगर जिल्ह्यात पांगरमलसह इतर ठिकाणी पंधरा जणांचा बळी गेला.
पारनेर : विषारी दारूमुळे नगर जिल्ह्यात पांगरमलसह इतर ठिकाणी पंधरा जणांचा बळी गेला. ही गंभीर बाब असून, त्याची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे़
अवैध दारू व्यवसायावर कारवाई करण्यात हलगर्जी करणारे पोलीस अधीक्षक व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांच्यावरही कारवाई करावी, असेही त्यांनी म्हटले आहे. शनिवारी पोलीस अधीक्षक डॉ़ सौरभ त्रिपाठी व उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांची भेट घेऊन कारवाईची माहिती दिली़ या कारवाईवर मात्र अण्णांनी नाराजी व्यक्त केली होती. (प्रतिनिधी)