नागरिकांनी टाकला चिनी मालावर बहिष्कार चायना वस्तू खरेदी न करण्याचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 03:50 PM2020-06-22T15:50:56+5:302020-06-22T15:51:21+5:30
अहमदनगर- येथील बालिकाश्रम रोडवरील नागरिकांनी एकत्र येत चिनी मालावर बहिष्कार टाकला आहे. कोणत्याही प्रकारे चिनी वस्तू खरेदी करायच्या नाहीत, असा निर्धार त्यांनी केला आहे. बालिकाश्रम रोडवरील विविध सोसायटी, इमारतीमधील नागरिकांनी एकत्र येत सोमवारी चिनचा निषेध केला. यामध्ये नागरिकांसह मुलेही सहभागी झाली होती.
अहमदनगर- येथील बालिकाश्रम रोडवरील नागरिकांनी एकत्र येत चिनी मालावर बहिष्कार टाकला आहे. कोणत्याही प्रकारे चिनी वस्तू खरेदी करायच्या नाहीत, असा निर्धार त्यांनी केला आहे. बालिकाश्रम रोडवरील विविध सोसायटी, इमारतीमधील नागरिकांनी एकत्र येत सोमवारी चिनचा निषेध केला. यामध्ये नागरिकांसह मुलेही सहभागी झाली होती.
चीनने घुसखोरी करून भारतीय सैन्यावर हल्ला केला.या हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना नागरिकांनी श्रद्धांजली वाहिली. चीनची आर्थिक कोंडी केल्यास चीन ठिकाण्यावर येईल. म्हणून बालिकाश्रम रोड, गीते हॉस्पिटल मागील पारिजात, ब्लॉसम व आॅर्चिड या कॉलनीतील नागरिकांतर्फे चिनी वस्तूंचा बहिष्कार करण्यात आला याप्रसंगी अॅड. राजेंद्र कांबळे, महावीर कांकरिया, सतीश बंड, आशिष शर्मा, ऋषिकेश मंगलारम, मनीष पुप्पाल, प्रितेश दुग्गड, अक्षय मेहता, सचिन नराल, सतीश कानिटकर, अविनाश भांडारकर, संजय कांबळे, अनिल शहा,राजेंद्र कडवा, डॉ. दिनेश पाटोळे, नारायण येवले, कालिदास तुम्मनपेल्ली, प्रवीण मेहता, लक्ष्मीकांत भोकरे, पंकज सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी नागरिकांनी चिनी वस्तू वापरणार नाहीत, अशी शपथ घेतली. तसेच 'बहिष्कार, चिनी मालाचा बहिष्कार', 'भारत माता कि जय' अशा घोषणा दिल्या. यावेळी फिजिकल डिस्टन्स च्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.
-----------------------
चीनला धडा शिकवण्यासाठी बहिष्कार घातलाच पाहिजे. भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात चायना माल विकला जात आहे.या मालावर नागरिकांनी बहिष्कार टाकल्यास चीनला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. चिनी मालाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी. वीर जवानांना स्मरण करून प्रत्येक भारतीय नागरिकांनी चिनी मालावर बहिष्कार घालावा.
-राजेंद्र कांबळे, नागरिक
---
फोटो- २२ बालिकाश्रम रोड
बालिकाश्रम रोडवरील नागरिकांनी चिन्ही मालावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार केला. तसेच अशी शपथही घेतली.