नागरिकांना मिळणार आपल्या गावातच लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:21 AM2021-08-29T04:21:54+5:302021-08-29T04:21:54+5:30
१८ वयोगटापासून पुढील वयोगटातील नागरिकांना गावात संबंधित आरोग्य केंद्राने लस उपलब्ध करून देत आहे. मात्र वयोवृद्ध लस घेण्यास उत्सुक ...
१८ वयोगटापासून पुढील वयोगटातील नागरिकांना गावात संबंधित आरोग्य केंद्राने लस उपलब्ध करून देत आहे. मात्र वयोवृद्ध लस घेण्यास उत्सुक नसल्याचे दिसत आहे. पण १८ ते ४५ वयोगटातील तरुण लस घेण्यास उत्स्फूर्त असल्याचे दिसत आहे. पण तरुण नागरिकांनी प्रथम आपल्या घरातील प्रत्येक वयोवृद्धांना लस देण्यास मदत करणे गरजेचे आहे.
.....................
प्रतिक्रिया
मागील पाच दिवसांपासून दहेगाव आरोग्य केंद्राचे कर्मचारी ठरलेल्या गावात लसीकरण ठेवून अचानक रद्द करत आहे. १०० असले तरी लसीकरण करावे.
-आत्माराम जोशी, ग्रामस्थ तीळवणी
......................
प्रत्येक गावात दोनशेच्या पुढे व्यक्तींचे लसीकरण करणे योग्य असते. आम्हाला आरोग्य कर्मचारी ॲडजस्ट करणे एवढे सोपे नसते. जेवढ्या लसी दिवसाला उपलब्ध होतील त्या त्याच दिवशी संपवण्याचे आदेश आहेत. तरी युवा तरुणांनी प्रथम आपल्या घरातील वयोवृद्धांना लसीकरण करून घ्यावे व आरोग्य प्रशासनास सहकार्य करावे.
- डॉ. वैशाली बडदे, विशेष वैद्यकीय अधिकारी कोपरगाव