नगरला आज पुन्हा २ कोरोना पॉझिटिव्ह आढळले; एकूण रुग्णसंख्या २१७
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 12:18 PM2020-06-08T12:18:00+5:302020-06-08T12:18:09+5:30
मुंबईहून संगमनेर येथे आलेल्या चाळीस वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने बाधा झाली आहे. वाशी मुंबईहून आलेल्या मेरी रोड शेवगाव येथे आलेल्या २२ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे.
अहमदनगर : मुंबईहून संगमनेर येथे आलेल्या चाळीस वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने बाधा झाली आहे. वाशी मुंबईहून आलेल्या मेरी रोड शेवगाव येथे आलेल्या २२ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे.
संगमनेर येथील खासगी प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या ३ रुग्णांचा जिल्ह्याच्या एकूण रुग्ण संख्येत समावेश करण्यात आला आहे. नव्या दोन रुग्णामुळे एकूण रुग्णसंख्या २१७ झाली आहे.
१५ व्यक्ती सोमवारी (दि.८ जून) कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यात तपासणी करून १३ जणांना बुथ हाॉस्पिटलमधून तर दोन जणांना लोणी येथून सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला.
सोमवारी कोरोनामुक्त झालेल्यामध्ये राहाता तालुक्यातील २, संगमनेर ६, शेवगाव १, कर्जत - २, अकोले २, नगर शहर १, पारनेर तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.