शहर बँकेचे खाते हॅक करण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 02:53 PM2019-06-14T14:53:47+5:302019-06-14T14:56:11+5:30
शहर सहकारी बँकेचे आयडीबीआय बँकेमधील खाते हॅक करून तब्बल ४५ लाख रूपयांची रक्कम दुसऱ्या खात्यात टाकण्याचा हॅकर्सचा प्रयत्न बँक अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे फसला.
अहमदनगर : शहर सहकारी बँकेचे आयडीबीआय बँकेमधील खाते हॅक करून तब्बल ४५ लाख रूपयांची रक्कम दुसऱ्या खात्यात टाकण्याचा हॅकर्सचा प्रयत्न बँक अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे फसला. शहर बँकेने याबाबत अहमदनगर येथील सायबर सेलकडे तक्रार दिली असून पोलीस हॅकर्सचा शोध घेत आहेत. शहर सहकारी बँकेचे आयडीबीआय बँकेच्या दिल्ली गेट शाखेत चालू खाते आहे. रविवारी सर्वच बँकांना सुटी होती. परंतु तरीही शहर बँकेच्या खात्यातून ४५ लाख रूपये काढल्याचा मेसेज बँक कर्मचारी समीर जोशी व संजय मुळे यांना मोबाईलवर आला. सुटी असतानाही ही रक्कम परस्पर खात्यातून कोणी काढली? यामुळे सावध होत या अधिकाºयांनी तत्परता दाखवत लगेच आयडीबीआय बँकेला कळवून खाते गोठवण्यास सांगितले. बँकेने तत्काळ ही खाती गोठवली.