शहर भाजपने केला राज्य सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:00 PM2021-03-21T16:00:52+5:302021-03-21T16:01:27+5:30

हे सरकार जनतेसाठी काम करत नसून स्वत:च्या फायद्यासाठी काम करत आहेत, असा  आरोप भाजपा शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी केला.

City BJP protested the state government | शहर भाजपने केला राज्य सरकारचा निषेध

शहर भाजपने केला राज्य सरकारचा निषेध

अहमदनगर : माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्याबाबत धक्कादायक विधान केले आहे. ही बाब गंभीर असून घटनेचा निषेध करत आहोत. सरकारचा आपल्या मंत्र्यांवर कोणताही वचक राहिला नाही.  या सरकारला सत्तेवर राहण्याचा काहीच अधिकार नाही. जनतेचे त्यांना काहीही देणे घेणे नाही. कोरोनाची भिती घालून यांचे अनाधिकृत उद्योग सुरु आहेत. दिवसेंदिवसे सरकारमधील एक-एक मंत्र्यांची नावे विविध प्रकारणातून पुढे येत आहेत. हे सरकार जनतेसाठी काम करत नसून स्वत:च्या फायद्यासाठी काम करत आहेत, असा  आरोप भाजपा शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी केला.

     शहर जिल्हा भाजपाच्यावतीने प्रोफेसर कॉलनी चौकात आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करुन निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, अ‍ॅड. अभय आगरकर, वसंत लोढा, संघटन सरचिटणीस विवेक नाईक, सरचिटणीस तुषार पोटे, महेश नामदे, नगरसेवक उदय कराळे, विलास ताठे, रविंद्र बारस्कर, शुभांगी साठे, सभागृहनेते मनोज दुलम, प्रा.भानुदास बेरड, उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, सचिन पारखी, शिवाजी दहिंडे, महिला अध्यक्षा अंजली वल्लाकट्टी, संगीता खरमाळे, मंडल अध्यक्ष वसंत राठोड, सतिश शिंदे, अजय चितळे, महेश तवले, ज्ञानेश्‍वर काळे, बाळासाहेब गायकवाड उपस्थित होते.

 

बाबासाहेब वाकळे म्हणाले, आज जनता कोरोना, वीज बील, महागाईने होरपळत असताना नागरिकांना दिलासा देण्याऐवजी हे सरकारमधील मंत्र्यांचे कारनामे बाहेर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच एका मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आला. तर आता सध्याचे गृहमंत्री हे पोलिसांकरवी हप्ते गोळा करण्याचे काम करत आहेत, विशेष म्हणजे ही बाब माजी पोलिस आयुक्तांनी निदर्शनास आणुन दिली. त्यामुळे सरकारमधील मंत्र्यांचा प्रशासनाचा आपल्या फायद्यासाठी उपयोग करत आहेत, हेच यातून दिसून येते. सरकार भ्रष्टाचार करण्यातच गुंतले आहे. त्यामुळे या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही.

 

वंदना पंडित, अमोल निस्ताने, संदिप अवचट, व्यंकटेश बोमादंडी, अमित गटणे, विवेक सरनाईक, साखला, हुजेफा सय्यद, सुजित खरमाळे, गणेश साठे, उमेश साठे, आकाश सोनवणे, राकेश भाकरे, यश शर्मा, आशिष देशमुख, शशांक कुलकर्णी, कैलास गर्जे, किशोर कटोरे, साहिल शेख, योगेश मुथा, डॉ.दर्शन करमाळकर, अभिजित सोनवणे, मृणाली मुथा, सुरज शिंदे, वैभव झोटिंग, सविता कोटा, प्रिया जानवे, स्वाती पवळे, सुप्रिया देपोलकर, गोखर शिंदे, नागेश शिंदे, पेमराज शिंदे, कार्तिक नगारे, सिद्धेश नाकाडे, अभिषेक वराळे, ऋग्वेद गंधे आदिंसह उपस्थित होते.

फोटो आहे. 

Web Title: City BJP protested the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.