नगर बाजार समितीत खरेदीसाठी गर्दी; दिवसाआड बाजार भरविण्याचा समितीचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 12:06 PM2020-03-24T12:06:46+5:302020-03-24T13:39:40+5:30
अहमदनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला खरेदीसाठी मंगळवारी सकाळी प्रचंड गर्दी झाल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळे बाजार समितीतील गर्दी कमी करून भाजीपाल्याचा बाजार दिवसाआड भरविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याचे सचिव भिसे यांनी सांगितले.
अहमदनगर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला खरेदीसाठी मंगळवारी सकाळी प्रचंड गर्दी झाल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळे बाजार समितीतील गर्दी कमी करून भाजीपाल्याचा बाजार दिवसाआड भरविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याचे सचिव भिसे यांनी सांगितले. कोराना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. भाजीपाला अत्यावश्यक असल्याने भाजीपाल्या या बंदीत वगळण्यात आले आहे. उद्या बुधवारी भाजी बाजार बंद असतो़ त्यात गेल्या दोन दिवसांपासून भाजी बाजार शेतकरी माल घेऊन येत नाहीत. भाजीपाला संपून जाईल, या भितीने शहरातील किरकोळ विक्रेत्यांनी व ग्राहकांनी एकच गर्दी केली होती. बाजार समिती प्रशासनाने गर्दी टाळण्याचा प्रयत्न केला. परंतु, कुणीही एकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे बाजार समिती प्रशासनाने दिवसाआड भाजीपाल्याचा बाजार भरविण्याचा निर्णय घेत असल्याचे भिसे यांनी सांगितले.