नगर शहरात अतिवृष्टी : दोन तासांत तब्बल ९० मिलीमीटर पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 01:25 PM2019-07-21T13:25:43+5:302019-07-21T13:30:01+5:30
अहमदनगर महापालिका क्षेत्र काल पावसाने झोडपून काढले. अवघ्या दोन तासांमध्ये अहमदनगर शहरात सरासरी ९० मिलीमीटर पाऊस झाला.
अहमदनगर : अहमदनगर महापालिका क्षेत्र काल पावसाने झोडपून काढले. अवघ्या दोन तासांमध्ये अहमदनगर शहरात सरासरी ९० मिलीमीटर पाऊस झाला. या पावसामुळे शहरात मोठी वित्तहानी झाली आहे.
काल दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास शहरात पाऊस झाला. सुमारे दोन पाऊस झाला. सावेडी परिसरात पावसाचा सवार्धिक जोर होता. काल सावेडीत ११७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर शहरातील मध्यवर्ती भागालाही पावसाने झोडपले. नालेगावमध्ये १०८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर नागापूरमध्ये ८२ मिलीमीटर, भिंगारमध्ये ८० मिलीमीटर तर केडगावमध्ये सर्वात कमी ५२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या अतिवृष्टीमुळे शहरातील अनेक घरांमध्ये, दुकानांमध्ये पाणी घुसले.
पावसाची आकडेवारी
सावेडी - ११७ मिमी
नालेगाव - १०७ मिमी
नागापूर -८२ मिमी
भिंगार - ८० मिमी
केडगाव - ५२ मिमी