नगरचा पॉझिटिव्ह रेट ४० टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:20 AM2021-05-16T04:20:13+5:302021-05-16T04:20:13+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात सध्या रोज १० हजार कोरोना चाचण्या होत आहेत. त्यापैकी सरासरी चार हजार जण पॉझिटिव्ह येत आहेत. ...
अहमदनगर : जिल्ह्यात सध्या रोज १० हजार कोरोना चाचण्या होत आहेत. त्यापैकी सरासरी चार हजार जण पॉझिटिव्ह येत आहेत. हा आकडा कमी- जास्त येत असला तरी पुन्हा चार हजारांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे चाचण्यांपैकी पॉझिटिव्ह येण्याऱ्यांचे प्रमाण हे ४० टक्के असून, हे प्रमाण राज्याच्या प्रमाणपेक्षाही अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शनिवारी ३,५९२ रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले, तर ३,१४४ जणांची रुग्णसंख्येत भर पडली आहे.
जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत शनिवारी ३,१४४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता २२ हजार ४६१ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १४७, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १,८१७ आणि अँटिजन चाचणीत १,१८० रुग्ण बाधित आढळले.
जिल्ह्यात एकाच एप्रिल महिन्यात ८० हजार कोरोनाबाधित आढळून आले. मे महिन्याच्या पहिल्याच महिन्यात पॉझिटिव्ह रेट ४० टक्क्यांपर्यंत गेला. पॉझिटिव्ह रेटमध्ये अहमदनगरने राज्याला मागे टाकले आहे. एखाद्या दिवशी चाचण्या कमी झाल्या तरी बाधितांचे प्रमाण हे वाढतच आहे. एक ते आठ मे या कालावधीत पॉझिटिव्ह रेट २६ टक्क्यांवरून थेट ४० टक्क्यांवर पोहोचला आहे. आठ दिवसांत ३० हजार ९४७ रुग्णांची भर पडली आहे. नगर शहरात रुग्ण कमी झाले असले तरी ग्रामीण भागात रुग्ण वाढत आहेत.
----
एप्रिल महिन्यातील बाधित- ८०,११८
१ ते १४ मेपर्यंतचे बाधित- ५३,६७३
एकूण बरे झालेले : २,०३,८४२
सक्रिय रुग्ण : २२,४६१
मृत्यू : २,४५०
एकूण रुग्ण : २,२८,७५३