दिवाणखाना बंद करण्यावरुन जामखेडमध्ये कलाकेंद्र चालकांमध्ये हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 06:53 PM2018-06-10T18:53:45+5:302018-06-10T18:54:14+5:30
तालुक्यातील मोहा शिवारात बीड रस्त्यावर टाकलेला दिवाणखाना मोहा ग्रामस्थांनी रद्द करावा, असे का म्हणाला यावरून दोन कलाकेंद्र चालकांमध्ये फोनवरून शिविगाळ, दमदाटी करण्यात आली. व १० जून रोजी रात्री एकच्या सुमारास घुंगरू कलाकेंद्रावर झोपलेल्या कलाकेंद्र चालकास पाच जणांनी मारहाण करून त्याच्या दोन बहिणींचा विनयभंग केला, अशी तक्रार एका कलाकेंद्र चालकाने दिली. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
जामखेड : तालुक्यातील मोहा शिवारात बीड रस्त्यावर टाकलेला दिवाणखाना मोहा ग्रामस्थांनी रद्द करावा, असे का म्हणाला यावरून दोन कलाकेंद्र चालकांमध्ये फोनवरून शिविगाळ, दमदाटी करण्यात आली. व १० जून रोजी रात्री एकच्या सुमारास घुंगरू कलाकेंद्रावर झोपलेल्या कलाकेंद्र चालकास पाच जणांनी मारहाण करून त्याच्या दोन बहिणींचा विनयभंग केला, अशी तक्रार एका कलाकेंद्र चालकाने दिली. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मोहा हद्दीतील घुंगरू कलाकेंद्राचा चालक विशाल जाधव याने फिर्याद दिली. शनिवार दि. ९ जून रोजी दुपारी चारच्या सुमारास घुंगरू कलाकेंद्रावर असताना अनिल विश्वनाथ पवार (रा. कान्होपात्रा नगर जामखेड) फोन करून म्हणाला, आमचे पाव्हणे संतोष पवार यांनी टाकलेला दिवाणखाना मोहा ग्रामस्थांनी रद्द करावा असे का म्हणाला व फोनवरून शिविगाव करुन दमदाटी केली. यावर मी काही केले नाही असे म्हणालो असता पवार याने फोनवर आम्ही तुला बघून घेतो असे म्हणाला.
रविवार दि. १० रोजी रात्री एकच्या सुमारास फिर्यादी विशाल जाधव त्याच्या घुंगरू कलाकेंद्रावर झोपलेला असताना अनिल विश्वनाथ पवार, रोहित अनिल पवार, आकाश लिलावती चंदन, बबन बन्सी चंदन, अजय रंजना चंदन (सर्व रा. कान्होपात्रा नगर, जामखेड) हे या ठिकाणी आले व फिर्यादी विशाल जाधव यास मारहाण करण्यास सुरवात केली. यापैकी आकाश चंदन व रोहित पवार यांनी काठीने डोके व पायावर मारहाण केली. यावेळी फिर्यादीच्या दोन बहिणी भांडणे सोडविण्यासाठी आल्या असता अनिल पवार व बन्सी चंदन यांनी त्यांचा विनयभंग केला. यावेळी झालेल्या झटापटीत बहिणींच्या गळ्यातील गंठण गहाळ झाले. अशी फिर्याद घुंगरू कलाकेंद्राचे चालक विशाल जाधव यांनी दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.