सहकाराच्या बालेकिल्ल्याला हादरा

By Admin | Published: May 18, 2014 12:10 AM2014-05-18T00:10:22+5:302024-03-20T11:06:49+5:30

वि खेंनीच वाकचौरे यांना पक्षात आणून उमेदवारी दिली अन् त्यांच्याच मतदारसंघात विरोधकांनी आघाडी घेतली़ ही बाब आत्मचिंतन करण्यास भाग पाडणारी आहे.

The clash of the citadel of the co-operative | सहकाराच्या बालेकिल्ल्याला हादरा

सहकाराच्या बालेकिल्ल्याला हादरा

वि खेंनीच वाकचौरे यांना पक्षात आणून उमेदवारी दिली अन् त्यांच्याच मतदारसंघात विरोधकांनी आघाडी घेतली़ ही बाब आत्मचिंतन करण्यास भाग पाडणारी आहे. मोदींच्या वादळाने देशभर अनेक परंपरागत गड नेस्तनाबूत झाले असतानाच सहकाराचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या शिर्डीलाही मोठा व अनपेक्षित हादरा बसला़ शिर्डीत गेल्या वेळी वाकचौरेंना आठवले फॅक्टरमुळे, तर यंदा लोखंडे यांना मोदी फॅक्टरमुळे लॉटरी लागली़ या निवडणुकीत मोदी फॅक्टरबरोबरच काँग्रेस-राष्ट्रवादी तसेच काँग्रेसची पक्षांतर्गत असलेली गटबाजी लोखंडेना विजयाकडे घेऊन गेली़ विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षात वाकचौरे यांनी जवळपास साडेपाचशे गावांत सभामंडप उभारले, गावोगावी अनेक कामे केली, खासदार निधी शेवटच्या घटकापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला़़ हात दाखवा व गाडी थांबवा असा अनुभव असतानाही मतदारांनी वाकचौरेंची गाडी पंक्चर करून एका अनोळखी उमेदवाराच्या हाती चाव्या सोपावल्या़ येथील मतदारही नसलेल्या आणि केवळ चार आठवड्याचा वेळ मिळालेल्या लोखंडे यांना कार्यकर्त्यांची व गावांचीही पुरती ओळख झाली नसतानाही मतदारांनी त्यांच्यावर अक्षरश: मतांचा वर्षाव केला़ गेल्या वेळी वाकचौरे यांच्यावर असाच वर्षाव झाला होता़यावेळी उमेदवाराच्या रूपाने तेच वाकचौरे होते, मात्र कोणत्याही सबळ कारणाशिवाय त्यांनी पक्ष बदलला व गेल्या वेळच्या विजयाचे श्रेय प्रस्तापितांना दिले हीच बाब सामान्य मतदाराला खटकली़ साईबाबांच्या मोडलेल्या शपथेचा महायुतीने केलेला भावनिक मुद्दा लोखंडेसाठी भांडवल ठरला़वाकचौरे यांना काँग्रेसमध्ये आणणार्‍या विखे यांनी शिर्डीत निवडणूक प्रतिष्ठेची केली़ मात्र स्थानिक व गावपातळीवरील कार्यकर्त्यांनी स्वत: विखे उमेदवार नसल्याने गांभिर्याने प्रचार केल्याचे जाणवले नाही़ उलट शिवसेनेने वाकचौरे यांचा पक्षत्याग गंभिरतेने घेतला़ यंदा वाढलेली तरुणांची दहा टक्के मतेही मोदींमुळे लोखंडेंच्या झोळीत पडली़

Web Title: The clash of the citadel of the co-operative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.