वर्गमित्र करताहेत मित्राच्या कुटुंबियांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:20 AM2021-05-13T04:20:20+5:302021-05-13T04:20:20+5:30
सव्वा ते दीड लाख रुपये जमा करण्याचा दहावी बॅच ग्रुपचा मानस आहे. रवींद्र कुटे हा तरूण पुणे येथे ...
सव्वा ते दीड लाख रुपये जमा करण्याचा दहावी बॅच ग्रुपचा मानस आहे. रवींद्र कुटे हा तरूण पुणे येथे खासगी कंपनीत होता.
कुटे आजारी पडल्यानंतर सुशील शेवाळे व मित्रांच्या प्रयत्नाने उपचार सुरू झाले. मात्र, मित्रांचे व रवीच्या कुटुंबीयांच्या प्रयत्नांना यश आले नाही. भूमिहीन आणि हातावर पोट असणारा हा मित्र काळाच्या पडद्याआड गेला.
यापूर्वीच रवीची आई ब्लड कॅन्सरने व वडील अपघाताने दगावले. मोठा भाऊ अशोक यानेही इहलोकीचा निरोप घेतला.
संपूर्ण कुटुंबांची जबाबदारी त्याच्यावर होती.
रवीला एकुलती एक मुलगी झाली. तिला जन्मजात अपंगत्व आहे. तीन - चार महिने दवाखान्यात उपचारासाठी दहा - बारा लाख रुपये खर्च केला. रात्रीचा दिवस करुन कर्ज फिटते न फिटते तोच त्यास कोरोनाची बाधा झाली. उपचार मिळाले. पण, थोडा उशीर झाला. त्याचे पुतणे यांनी चुलत्याच्या आजारपणात धावपळ व आर्थिक मदत केली.
रवीचा हा संघर्ष जवळून पाहणारे त्याचे गावातील मित्र संतोष नाईकवाडी यांनी सोशल मीडियावर मदत करण्याचे आवाहन केले. संतोष ढगे यांनी दहा हजार रुपये पाठविले.
सुरेश नवले, सुनील पुंडे, भानुदास कानवडे, संजय तिकांडे, संदीप जंगले, नारायण पुंडे, अभियंता श्रीकांत नवले, संदीप पानसरे, उज्ज्वला कासार, वकील महेश मोरे यांच्यासह अनेक मित्रांनी यात भरीव सहभाग नोंदविला आहे.