साधनेमुळे मन निर्मळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 13:51 IST2019-09-17T13:51:32+5:302019-09-17T13:51:56+5:30
महावीर कथेमुळे आत्मज्योत प्रकट होते. महापुरुषांच्या कथा अनुकरणीय, संस्मरणीय असतात. या कथांमुळे माणूस जयवंत होऊ शकतो. म्हणून महापुरुषांचा आदर्श घ्यावा. काही केल्यामुळे काही मिळेल असा भाव ठेवू नये. अध्यात्मात निरपेक्ष भाव असावा.

साधनेमुळे मन निर्मळ
सन्मतीवाणी
महावीर कथेमुळे आत्मज्योत प्रकट होते. महापुरुषांच्या कथा अनुकरणीय, संस्मरणीय असतात. या कथांमुळे माणूस जयवंत होऊ शकतो. म्हणून महापुरुषांचा आदर्श घ्यावा. काही केल्यामुळे काही मिळेल असा भाव ठेवू नये. अध्यात्मात निरपेक्ष भाव असावा. महापुरुषांचा आदर्श सतत डोळ्यापुढे ठेवून आपण आपले आयुष्य घालवावे. निरपेक्ष भावाने कोणतीही साधना केली तर त्याचे फळ मिळते. साधनेमुळे मन निर्मळ होते. महावीरांनी बारा वर्ष तपश्चर्या केली. साधनेमुळे कर्मातून मुक्त होता येते. साधू संगतीने संयमवृत्ती शिकावयास मिळते. संयमाने जीवनात बदल होतो. कोणाचाही सूड घेण्याची भावना ठेवू नका. सर्वांविषयी स्नेहभाव असावा तरच एकमेकांची मने जुळतील. स्नेहभाव परस्परांतील वैर नष्ट करतो. जेथे जेथे घमंड आहे, गर्व आहे, तेथे प्रकाशाची ज्योत पेटत नाही. क्रोध आणि क्रू रतेने नरक प्राप्त होतो.
जयमलजी महाराज साहेबांची ३१० जयंती साजरी होत आहे. जयमलजी यांनी लिहिलेली साधू वंदना दररोज म्हटली पाहिजे. साधूंच्या चरणांचा आशीर्वाद घेतला पाहिजे. प्रेम असेल तर प्रत्येक घर स्वर्ग होऊ शकते. जयमलजी यांनी कठोर साधना केली. त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रभावी होते. त्यांनी जैन धर्माचा प्रसार केला. त्यांना निद्राविजेता असे म्हणत. कारण ते कधी कधी झोपत नव्हते. बैठ्या अवस्थेत त्यांना झोप घेण्याची सवय होती. महापुरुष हे दीपस्तंभ असतात. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण वागले पाहिजे.
- पू. श्री. सन्मती महाराज