मुळा धरणाचा डावा कालवा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 01:55 PM2019-10-05T13:55:33+5:302019-10-05T13:57:06+5:30

मुळा धरणाचा डावा कालवा शुक्रवारी सकाळी बंद करण्यात आला.दोन महिन्याच्या दीर्घ कालावधीनंतर कालवा बंद करण्यात आल्याची माहिती अभियंता विकास गायकवाड यांनी दिली़ मात्र उजव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सुरू आहे़

Close the left canal of the root dam | मुळा धरणाचा डावा कालवा बंद

मुळा धरणाचा डावा कालवा बंद

राहुरी : मुळा धरणाचा डावा कालवा शुक्रवारी सकाळी बंद करण्यात आला.दोन महिन्याच्या दीर्घ कालावधीनंतर कालवा बंद करण्यात आल्याची माहिती अभियंता विकास गायकवाड यांनी दिली़ मात्र उजव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सुरू आहे़
मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी ६ आॅगस्ट रोजी आवर्तन सोडण्यात आले होते़ शेतीसाठी डाव्या कालव्यातून ७८७ दशलक्ष घनफूट इतके पाणी सोडण्यात आले़ उजव्या कालव्यातून शेतीसाठी ७०१ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे़ नदीपात्रातून ३८९६ दशलक्ष घनफूट पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला़ मुळा धरणात २६००० दशलक्ष घनफूट  पाणी साठ्याची नोंद झाली आहे़ मुळा डाव्या कालव्याच्या माध्यमातून कणगर, गुहा, गणेगाव आदी भागातील ३० तळे भरण्यात आले आहे़ पाणलोट क्षेत्रावर समाधानकारक पाऊस पडल्याने मुळा धरणातून आवश्यक त्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले़ मुळा धरण भरल्याने यंदा पुरेशा प्रमाणावर शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार आहे़
मुळा धरण १०० टक्के भरले
मुळा धरणाची पाणी साठवण क्षमता २६ हजार दशलक्ष घनफूट इतकी आहे़ धरण पूर्ण क्षमतेने १०० टक्के भरले आहे़ परतीचा पाऊस अद्याप सुरू झालेला नाही़ त्यामुळे कोतूळ व पारनेर परिसरात पाऊस पडल्यास नदी पात्रातून पुन्हा पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते़

Web Title: Close the left canal of the root dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.