वाघापूर परिसरातील एक बिबट्या पिंजऱ्यात बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 05:45 PM2018-05-15T17:45:30+5:302018-05-15T17:47:58+5:30

गेल्या पंधरा दिवसांपासून वाघापूर येथील आरोटे वस्तीवर धुमाकूळ घालून सहा शेळ्या फस्त करणा-या तीन बिबट्यांपैकी मंगळवारी पहाटे दोन वाजता एक बिबट्या पिंज-यात अडकला.

Close to a leopard cage in the Waghapur area | वाघापूर परिसरातील एक बिबट्या पिंजऱ्यात बंद

वाघापूर परिसरातील एक बिबट्या पिंजऱ्यात बंद

ठळक मुद्दे वनविभागाला यश आणखी दोन बिबट्यांचा शोध सुरू

कोतूळ : गेल्या पंधरा दिवसांपासून वाघापूर येथील आरोटे वस्तीवर धुमाकूळ घालून सहा शेळ्या फस्त करणा-या तीन बिबट्यांपैकी मंगळवारी पहाटे दोन वाजता एक बिबट्या पिंज-यात अडकला. तर दोन बिबट्यांसाठी पिंजरा पुन्हा लावण्यात येईल, असे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले.
बिबट्यांच्या दहशतीपासून बचाव करण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी भाग्यश्री पोले यांनी विशेष लक्ष दिले आहे. तर वन कर्मचारी उज्ज्वला गावंडे, शिवाजी देशमुख, बी.डी.गोसावी या परिसरात ठाण मांडून आहेत.

तीन पैकी एक बिबट्या पकडला आहे. त्याची आई व आणखी एक बछडा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिंजरा लावलेल्या परिसरात नागरिकांनी जावू नये.
-भाग्यश्री पोले, वन परीक्षेत्र अधिकारी, अकोले.

 

Web Title: Close to a leopard cage in the Waghapur area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.