अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:20 AM2021-04-10T04:20:42+5:302021-04-10T04:20:42+5:30
जिल्हा प्रशासनाने याबाबत अधिकृत आदेश ६ एप्रिल रोजी काढला असून त्या नुसार शुक्रवार रात्री आठ ते सोमवारी सकाळी सात ...
जिल्हा प्रशासनाने याबाबत अधिकृत आदेश ६ एप्रिल रोजी काढला असून त्या नुसार शुक्रवार रात्री आठ ते सोमवारी सकाळी सात या वेळेत अधिकृत कारणाशिवाय किंवा पूर्व परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास मनाई असेल. तथापि या कालावधीत जे लोक रेल्वे, बसने प्रवास करून येत असतील त्यांनी त्यांच्याजवळील अधिकृत तिकीट जवळ बाळगायचे आहे. औद्योगिक कामगार, तसेच परीक्षा केंद्रावर जाणारे विद्यार्थी यांनी त्यांच्याकडील अधिकृत ओळखपत्र जवळ बाळगावे. सर्व धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम दोन दिवस बंद राहतील. लग्नसमारंभाच्या आयोजनाला ही मनाई असेल.
--------------
अत्यावश्यक सेवा राहतील सुरू
पेट्रोल पंप व पेट्रोलजन्य पदार्थ, सर्व प्रकारच्या कार्गो सेवा, डाटा सेंटर, क्लाऊड सेवा पुरवठादार, अत्यावश्यक व आपत्कालीन सेवांना माहिती-तंत्रज्ञान सेवा पुरवणारे पुरवठादार, खासगी व शासकीय सुरक्षा सेवा, फळ विक्रेते, वीज, टेलिफोन, विमा, मेडिक्लेम, इतर आरोग्य सेवा.
------------
खासगी वाहतूक पूर्णपणे बंद
सर्व खासगी वाहतूक या दिवशी बंद राहील. केवळ आपत्कालीन स्थितीत किंवा अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच यातून ओळखपत्र दाखवून सूट असेल.