जिल्ह्यातील पतसंस्थांचा बंद; उपनिबंधक कार्यालयासमोर धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:52 PM2017-07-20T12:52:44+5:302017-07-20T12:52:44+5:30

जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांनी एक दिवसाचा संप पुकारला असून जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे़

Closing of the credit institutions in the district; Demolition movement before the Deputy Registrar's office | जिल्ह्यातील पतसंस्थांचा बंद; उपनिबंधक कार्यालयासमोर धरणे आंदोलन

जिल्ह्यातील पतसंस्थांचा बंद; उपनिबंधक कार्यालयासमोर धरणे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर, दि़ २० - सहकारी पतसंस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी व वर्षानुवर्षे प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांनी एक दिवसाचा संप पुकारला असून जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे़
गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास जिल्हाभरातील पतसंस्थांचे पदाधिकारी, कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवून जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले़ या आंदोलनात काका कोयटे, सुरेश वाबळे, कडूभाऊ काळे, वसंत लोढा, शिवाजी कपाळे, आर. डी. मंत्री, सबाजीराव गायकवाड, प्रताप भोसले आदींनी सहभाग घेतला़
पतसंस्थांच्या थकबाकीदारांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सहज, सुलभ परंतु कठोर व्हावी, पतसंस्थांच्या ठेवींना विमा संरक्षण मिळावे, राज्य सरकारने नियुक्त केलेले नियामक मंडळ रद्द करावे, पतसंस्था स्थैर्यनिधी संघ संचलित लिक्विडिटी बेस डिपॉझिट प्रोटेक्शन फंड राज्यभर लागू करावा, सहकारी बँकांमध्ये पतसंस्थांच्या अडकलेल्या ठेवी परत मिळाव्यात. कलम १०१ प्रमाणे दाखल होणारे दावे ३० दिवसांत निकाली काढावेत, जंगम व स्थावर मालमत्तांवर एकाचवेळी जप्तीच्या कारवाईची शिफारस करावी, अशा सुमारे २१ मागण्या पतसंस्थांच्यावतीने करण्यात आल्या आहेत.

Web Title: Closing of the credit institutions in the district; Demolition movement before the Deputy Registrar's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.