कोपरगाव शहरात कडकडीत बंद, अत्याचाराचा निषेध
By Admin | Published: July 5, 2017 01:25 PM2017-07-05T13:25:48+5:302017-07-05T13:25:48+5:30
मतीमंद मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ कोपरगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ शहरात मोर्र्चाही काढण्यात आला. या मोर्र्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : मतीमंद मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ कोपरगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ शहरात मोर्र्चाही काढण्यात आला. या मोर्र्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. यावेळी या घटनेचा निषेध करण्यात आला. तसेच आरोपीला कठोर शिक्षा करण्याती मागणी करण्यात आली. आमदार स्नेहलता कोल्हे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, उपनगराध्यक्ष विजय वाजे, राष्ट्रवादीच्या पुष्पा काळे, काका कोयटे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख कैलास जाधव, शहर प्रमुख असलम शेख, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड, मनसेचे सतीष काकडे हे सहभागी झाले होते. प्रशासनाच्या वतीने प्रातांधिकारी रवींद्र ठाकरे, पोलिस उपअधीक्षक सागर पाटील, पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे, साहेबराव कडनोर उपस्थित होते.