ढगाळ हवामानामुळे अहमदनगर जिल्ह्यात सूर्यग्रहण दिसण्यात अडथळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 11:08 AM2020-06-21T11:08:00+5:302020-06-21T11:08:08+5:30

अहमदनगर : आज रविवारी सूर्यग्रहण पाहण्याची मोठी संधी आहे, मात्र ढगाळ हवामानामुळे सूर्यग्रहण पाहण्यात अडथळे येत आहेत.

Cloudy weather hinders solar eclipse in Ahmednagar district | ढगाळ हवामानामुळे अहमदनगर जिल्ह्यात सूर्यग्रहण दिसण्यात अडथळे

ढगाळ हवामानामुळे अहमदनगर जिल्ह्यात सूर्यग्रहण दिसण्यात अडथळे

अहमदनगर : आज रविवारी सूर्यग्रहण पाहण्याची मोठी संधी आहे, मात्र ढगाळ हवामानामुळे सूर्यग्रहण पाहण्यात अडथळे येत आहेत.

सकाळी दहा वाजता सूर्यग्रहण सुरू झाले. मात्र ढगाळ वातावरण असल्याने ग्रहण दिसण्यात अडथळे येत आहेत. हा दुर्मिळ योग आपल्या डोळ््यात  साठविण्यासाठी लोक आतुर झालेले आहेत. अधून-मधून सूर्याचे दर्शन होते आणि पुन्हा ढग येतात. त्यामुळे उन-सावलीचा सध्या खेळ सुरू आहे.


आज नगर जिल्ह्यात पावसाचे वातावरण नसले तरीही ढगाळ हवामान आहे. त्यामुळे दुपारी दीडवाजेपर्यंत कसे वातावरण सांगता येत नाही. दुसरीकडे मोठ्या पावसाचा इशारा दिलेला आहे. मात्र चार तासात पाऊस येईल, अशी सध्यातरी शक्यता नाही. त्यामुळे सूर्यग्रहण दिसेल, अशी जिल्ह्यातील नागरिकांना आशा आहे.


 

Web Title: Cloudy weather hinders solar eclipse in Ahmednagar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.