थंडीचा आणखी दोन दिवस मुक्काम राहणार : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 06:28 PM2019-01-09T18:28:04+5:302019-01-09T18:29:09+5:30
थंडीमुळे भाजीपाला गारठला आहे़
राहुरी : थंडीमुळे भाजीपाला गारठला आहे़ भाजीपाल्याचे उत्पादन घटल्याने आवक घटली आहे़ त्यामुळे भाजीपाल्याला तेजी येऊ लागली आहे़ क डक थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात मंगळवारी ६़९ डिग्री सेल्सिअसची नोंद झाली असून थंडीचा मुक्काम आणखी दोन दिवस राहणार आहे, असे विद्यापीठाच्या हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
उत्तरेकडून महाराष्ट्रात थंड वारे येत आहेत.उत्तरेत पडलेल्या बर्फामुळे थंड वारे सुरू झाले आहेत़ बुधवार व गुरूवारपर्र्यंत थंडीचे प्रमाण अधिक राहणार आहे़ शुक्रवारनंतर थंडीची तीव्रता हळूहळू कमी होत जाणार आहे़ फेबुवारी अखेरपर्यंत हिवाळा ऋतू राहणार आहे़ त्यानंतर मार्चमध्ये उन्हाळा ऋतू सुरू होणार आहे़ कडाक्याची थंडी कधी कमी होते याकडे लोकांचे लक्ष वेधले आहे़ या थंडीचा गहू व हरभरा या पिकांना फायदा होत आहे़ मात्र वाढत्या थंडीमुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे़ त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात सुधारणा झाली आहे़
९ ते १३ जानेवारी येत्या पाच दिवसात अहमदनगर परिसरात कमाल तापमान ३० ते ३३ अंश सेल्सिअस राहील़ किमान तापमान ६ ते ९ अंश सेल्सिअस राहील़ कमाल आर्द्रता ७७ ते ७९ टक्के राहील़ कि मान आर्द्रता २८ ते ३३ टक्के राहील़ वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ किलोमीटर इतका राहील. -ग्रामीण कृषी मौसम सेवा विभाग, महात्मा फु ले कृषी विद्यापीठ, राहुरी़
थंडीचे प्रमाण कमी झाल्यामुळे शेतीमधील उत्पादनात घट झाली आहे़ त्यामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात घट झाली आहे़ मात्र गहू व हरभरा पिकाला थंडीचा फायदा होत आहे़ पिकांवर रोग व किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे़ मनुष्याबरोबरच थंडीचा तडाखा जनावरांनाही सहन करावा लागत आहे. -भगवान झडे , शेतकरी.