केडगावच्या शिबरात ५८ पिशव्या रक्त संकलन

By | Published: December 8, 2020 04:17 AM2020-12-08T04:17:48+5:302020-12-08T04:17:48+5:30

केडगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नगर शहरामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान ...

Collection of 58 bags of blood in Kedgaon camp | केडगावच्या शिबरात ५८ पिशव्या रक्त संकलन

केडगावच्या शिबरात ५८ पिशव्या रक्त संकलन

केडगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नगर शहरामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे आयोजन ‘तुम्ही आम्ही सर्व मित्र परिवार’ या शीर्षकाखाली करण्यात आले होते. यावेळी ५८ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले.

यासाठी मैत्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्याम कांबळे आणि मनोज पवार यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाची सुरुवात रक्तदानसाठी स्वयंस्फूर्तीने आलेल्या अक्षदा प्रवीण गायकवाड आणि प्रवीण गायकवाड या पत्नी-पतीच्या रक्तदानाने झाली. यावेळी मानवाधिकार अभियानाचे ॲड. संतोष गायकवाड, डॉ. संतोष साळवे, अशोक केदारे, दीपक गायकवाड, प्रा. अमोल खाडेसर, विवेक भिंगारदिवे, अमित भंडारे, चंद्रकांत बिरारे, संतोष तिजोरे, तय्यब तांबोळी, रुद्राक्ष कांबळे, प्रसाद कांबळे, रिझवान शेख, महेश बोरुडे, अजित कोतकर, अविनाश कांबळे आदी उपस्थित होते.

Web Title: Collection of 58 bags of blood in Kedgaon camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.