निवेदन हातामध्ये घेण्यास जिल्हाधिका-यांनी दिला नकार; भाजपचे पदाधिकारी भडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 03:51 PM2020-08-10T15:51:33+5:302020-08-10T15:52:34+5:30

जिल्ह्याधिकारी राहुल द्विवेदी यांनी  शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडून शिवसेनेचे निवेदन स्वीकारले. मात्र भाजपच्या पदाधिका-यांचे निवेदन स्वीकारले नाही. त्यामुळे पदाधिकारी भडकले. हा दुजाभाव केल्याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे भाजप शहराध्यक्ष भैय्या गंधे यांनी सांगितले.

The Collector refused to take the statement in hand; BJP office bearers erupted |  निवेदन हातामध्ये घेण्यास जिल्हाधिका-यांनी दिला नकार; भाजपचे पदाधिकारी भडकले

 निवेदन हातामध्ये घेण्यास जिल्हाधिका-यांनी दिला नकार; भाजपचे पदाधिकारी भडकले

अहमदनगर : जिल्ह्याधिकारी राहुल द्विवेदी यांनी  शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडून शिवसेनेचे निवेदन स्वीकारले. मात्र भाजपच्या पदाधिका-यांचे निवेदन स्वीकारले नाही. त्यामुळे पदाधिकारी भडकले. हा दुजाभाव केल्याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे भाजप शहराध्यक्ष भैय्या गंधे यांनी सांगितले.

सोमवारी (१० आॅगस्ट) घडलेल्या या प्रकारामुळे मात्र नवीन वादाला तोंड फुटले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात नगर शहरातील व्यापाºयांना दुकान बंद करण्याची वेळ दोन तास वाढवून देण्यात यावी, अशा मागणीसाठी भाजप व्यापारी आघाडीकडून निवेदन देण्यासाठी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गंधे हे व्यापारी आघाडीच्या पदाधिकाºयांसह आले होते. मात्र हे निवेदन कोविडमुळे प्रत्यक्ष हातामध्ये स्वीकारण्यास जिल्हाधिकारी यांनी नकार दिल्याचा दावा भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष यांनी केला आहे. 

तर, दुसरीकडे मात्र शिवसेनेचे एक निवेदन भाजपच्या पदाधिका-यांसमोरच खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिल्यानंतर ते जिल्हाधिकाºयांनी स्वीकारले. त्यामुळे मात्र भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गंधे यांचा चांगला संताप झाला. जिल्हाधिकारी हे दुजाभाव करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

अशा दुजाभाव पद्धतीने वागणाºया जिल्हाधिका-यांचा भाजपतर्फे आम्ही धिक्कार करीत आहोत.  यासंदर्भातील सविस्तर माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कळवणार आहे. त्यांच्याकडे या प्रकरणी कारवाई व्हावी, अशी मागणी करणार आहे.

Web Title: The Collector refused to take the statement in hand; BJP office bearers erupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.