महाविद्यालयीन गायन स्पर्धा
By Admin | Published: December 22, 2015 11:08 PM2015-12-22T23:08:26+5:302015-12-22T23:12:08+5:30
अहमदनगर : आंतर महाविद्यालयीन (सिनीयर व ज्युनिअर) युवक युवतींसाठी भव्य गायन स्पर्धा व्हॉईस आॅफ अहमदनगर आयोजित केली आहे.
अहमदनगर :लोकमत युवा नेक्स्ट आणि शैक्षणिक क्षेत्रात योग्य करिअर घडविण्यासाठी कटिबद्ध असलेले रायसोनी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन (सिनीयर व ज्युनिअर) युवक युवतींसाठी भव्य गायन स्पर्धा व्हॉईस आॅफ अहमदनगर आयोजित केली आहे. अंगभूत असणाऱ्या कलागुणांना चालना देण्यासाठी आणि युवा मनाला योग्य नेतृत्व देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेची प्राथमिक फेरी दि. २५ डिसेंबर रोजी स्थानिक डिपार्टमेंट आॅफ कम्युनिकेशन स्टडीज, न्यू आर्टस् कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज, अहमदनगर येथे दुपारी ३ वाजता पार पडणार असून इच्छुक स्पर्धकांनी खाली दिलेल्या फोन नंबरवर नोंदणी करावी. प्राथमिक फेरीतून निवडलेल्या स्पर्धकांना अंतिम फेरीत गाण्याची संधी मिळेल. अंतिम फेरीतील विजेता रायसोनी व्हॉईस आॅफ अहमदनगर २०१६ चा मानकरी ठरणार आहे.
अतिशय चुरशीच्या ठरणाऱ्या अशा स्पर्धांना नेहमीच युवक युवतींकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असतो. याही स्पर्धेत जास्तीत जास्त युवा कलाकारांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अंतिम स्पर्धा दि. २७ डिसेंबर २०१५ रोजी सरस्वती हॉल, पॅराडाईज हॉटेल मागे, नवीन टिळक रोड, अ.नगर येथे ४ वाजता होणार आहे.
या निमित्ताने गीत संगीताची मेजवानी समस्त रसिकांना मिळणार आहे. एकूणच नवोदित कलाकारांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांच्या कलेला जोपासण्याचा प्रयत्न या स्पर्धेतून होणार आहे. अंतिम स्पर्धेला सर्व लोकमत वाचक सादर आमंत्रित आहेत. अधिक माहितीकरिता संपर्क प्रतिक - ९८६०५३४४१४, ९८५०३०२८०२.