महाविद्यालये पुन्हा गजबजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:22 AM2021-02-16T04:22:29+5:302021-02-16T04:22:29+5:30
कोरोना काळात लॅाकडाऊन असल्याने मार्चपासून महाविद्यालये बंद होती. त्यामुळे मागील शैक्षणिक वर्षातील परीक्षा, तसेच नवीन प्रवेश व वर्षभर ऑनलाइन ...
कोरोना काळात लॅाकडाऊन असल्याने मार्चपासून महाविद्यालये बंद होती. त्यामुळे मागील शैक्षणिक वर्षातील परीक्षा, तसेच नवीन प्रवेश व वर्षभर ऑनलाइन अभ्यासक्रम याचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. कोरोनानंतर नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू झाले. गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून अकरावी, बारावीच्या वर्गांत विद्यार्थ्यांची उपस्थिती चांगली वाढत आहे.
दरम्यान, वरिष्ठ महाविद्यालयांचे वर्ग १५ फेब्रुवारीपासून सुरू झाले. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती. जिल्ह्यात दीडशे वरिष्ठ महाविद्यालये असून, त्यातील बहुतांश महाविद्यालये सोमवारी सुरू झाली. ५० टक्के क्षमतेसह वर्ग भरवण्याच्या विद्यापीठांच्या सूचना आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सांगितलेल्या खबरदारीच्या सूचनांचे पालन करून विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा आहे. त्या पद्धतीने महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जात होते.
---------
महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची चांगली उपस्थिती आहे. सोमवारी वरिष्ठ महाविद्यालयाचे वर्ग सुरू झाले. ५० टक्के क्षमतेसह विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था केली होती. ग्रामीण भागात अजूनही दळणवळणाची साधने कमी आहेत. ती उपलब्ध झाल्यास आणखी उपस्थिती वाढेल.
- डाॅ. भास्कर झावरे, प्राचार्य, न्यू आर्टस काॅलेज, अहमदनगर
-------
फोटो - १५काॅलेज
सोमवारपासून वरिष्ठ महाविद्यालये सुरू झाली. त्यामुळे शहरातील महाविद्यालये पुन्हा गजबजू लागली आहेत.