पिंपळनेरमध्ये आमदार विजय औटी यांच्या पुतळ्याचे दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 11:47 AM2018-08-31T11:47:22+5:302018-08-31T11:47:27+5:30
पारनेर तालुक्यातील वडनेर बुद्रूक येथील एका कार्यक्रमात मराठा समाजाविषयी शिवसेनेचे आमदार विजय औटी यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ आज पिंपळनेर येथे औटींच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
राळेगणसिद्धी : पारनेर तालुक्यातील वडनेर बुद्रूक येथील एका कार्यक्रमात मराठा समाजाविषयी शिवसेनेचे आमदार विजय औटी यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ आज पिंपळनेर येथे औटींच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी एक दिवस गाव बंद ठेवून आमदार औटी यांचा निषेध केला.
रविवारी वडनेर बुद्रूक येथे आमदार विजय औटी यांच्या प्रमुख उपस्थितीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथे झालेल्या एका कार्यक्रमात आमदार औटी यांनी भाषणातून मराठा समाजाबाबत अपशब्द वापरले. याची व्हिडिओक्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामुळे येथील मराठा समाजातील कार्यकर्त्यांकडून त्यांचा निषेध नोंदविण्यात आला. त्यानुसार पिंपळनेर येथील मराठा समाजातील तरूणांनी आज सकाळीच गावातील मुख्य चौकात आमदार औटींच्या पुतळ्याचे दहन करून त्यांचा निषेध केला. यावेळी मराठा समाजातील तरुणांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. सुभाष गाजरे, पोपट रासकर, देवेंद्र लटांबळे, दादा लटांबळे, संदीप शिर्के, विक्रांत गाजरे, सोमनाथ गाजरे, नवनाथ रासकर, संतोष रासकर, दत्तात्रय लटांबळे, अनिल सोनटक्के, सुजित वाढवणे, शैलेश गाजरे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.