जामखेडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 03:50 PM2018-07-24T15:50:35+5:302018-07-24T15:50:50+5:30
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, आरक्षणासाठी काकासाहेब शिंदे यांचा बळी गेला त्यांना हुतात्मा जाहीर करण्यात यावे या मागणीसाठी जामखेड येथील खर्डा चौकात रास्ता रोको करत मूख्ममंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गून्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळुन तब्बल तीन तास सुरू असलेले आंदोलन तहसीलदार यांना निवेदन देऊन मागे घेण्यात आले.
जामखेड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, आरक्षणासाठी काकासाहेब शिंदे यांचा बळी गेला त्यांना हुतात्मा जाहीर करण्यात यावे या मागणीसाठी जामखेड येथील खर्डा चौकात रास्ता रोको करत मूख्ममंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गून्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळुन तब्बल तीन तास सुरू असलेले आंदोलन तहसीलदार यांना निवेदन देऊन मागे घेण्यात आले.
मराठा अरक्षणाच्या मुद्यावरुन अत्यावश्यक सेवा वगळता महाराष्ट्र बंदला जामखेड शहरात शंभर टक्के कडकडीत बंद पाळण्यात आला. सकल मराठा समाजाने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्यानुसार आज सकाळपासूनच कार्यकर्ते मोटारसायकलवर फिरुन व्यापा-यांना आपली दुकाने बंद ठेवण्याचे सांगत होते. या बंदला व्यापा-यांनी चांगला प्रतिसाद दिला. यानंतर मराठा समाजाच्या अरक्षणाच्या मागणीसाठी खर्डा चौक येथे रास्ता रोको आंदोलन सुरू झाले. या वेळी खर्डा चौकातील संतप्त आंदोलन कर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना शासन आरक्षणाचे आश्वासन देऊन मराठा समाजाची दिशाभूल करीत आहे. मराठा समाज रसातळाल गेला आहे. स्व काकासाहेब शिंदे यांचे बलीदान व्यर्थ जाणार नाही शासनाने त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी. मराठा समाजाचे पुनर्वसन झाले पाहिजे. मराठा समाजाच्या मुलांना शिक्षणासाठी आरक्षण नाही. मराठा समाज्याचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती आहे. मात्र कुटुंबांमध्ये विभाजन झाल्याने प्रत्येकाच्या वाट्याला तुटपुंजी शेती आली. त्यामुळे मराठा समाज मोठा प्रमाणात आर्थिक संकटात सापडला आहे. अशा संतप्त भावना व्यक्त केल्या.
यावेळी मराठा समाज बांधवांनी शहरातून मोठी मोटारसायकलवरून रॅली काढली. यावेळी बीड रोड, खर्डा रोड व नगर रोड वर दोन ते तीन किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती. शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना निवेदन देऊन तीन तास सुरू आसलेले आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनात सकल मराठाचे मंगेश आजबे, प्रा मधूकर राळेभात, अरूण जाधव, अजय काशीद हिंदूराज मूळे, शरद शिंदे, पांडुरंग भोसले, शरद कार्ले, हवा सरनोबत, दिपक महाराज गायकवाड, विकास राळेभात, मनोज भोरे, संजय काशीद,गणेश हगवणे, सोमनाथ पोकळे, अरूण जाधव, कैलास हजारे, अमित जाधव, गूलाब जांभळे, संपत राळेभात उपस्थित होते. यावेळी समाजाच्या विविध संघटनांनी बंदला पाठींबा दिला. पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.