दिलासादायक... अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या १४४० पर्यंत घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 20:10 IST2021-05-30T20:10:13+5:302021-05-30T20:10:53+5:30
रविवारी जिल्ह्यात १४४० कोरोना रुग्ण आढळून आले. गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या प्रथमच दीड हजाराच्या खाली आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ११ हजार ८६३ इतकी झाली आहे.

दिलासादायक... अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या १४४० पर्यंत घटली
अहमदनगर : रविवारी जिल्ह्यात १४४० कोरोना रुग्ण आढळून आले. गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या प्रथमच दीड हजाराच्या खाली आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ११ हजार ८६३ इतकी झाली आहे. बाधित रुग्णांची संख्या प्रथमच दीड हजाराच्या आत आली असल्याने दिलासा मिळाला असला तरी ६१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद पोर्टलवर झाली आहे.
जिल्ह्यात रविवारी ११४५ कोरोनामुक्तांना रुग्णालयांतून घरी सोडण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४६ हजार १८७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.२४ टक्के इतके झाले आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४६५, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५७७ आणि अँटिजन चाचणीत ३९८ जण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर ६, अकोले ५, जामखेड ६४, कर्जत १, कोपरगाव १, नगर ग्रामीण २७, नेवासा ५१, पारनेर ४९, पाथर्डी ४८, राहता २४, राहुरी १, संगमनेर ४३, शेवगाव ११७, श्रीगोंदा ६, श्रीरामपूर २, कॅंटोन्मेंट बोर्ड ३, मिलिटरी हॉस्पिटल ५ आणि इतर जिल्हा ९ आणि इतर राज्य ३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा ४४, अकोले ९, जामखेड ३२, कर्जत ४९, कोपरगाव ७१, नगर ग्रामीण २४, नेवासा ९४, पारनेर २३, पाथर्डी ०८, राहाता २५, राहुरी ४९, संगमनेर २६, शेवगाव ४७, श्रीगोंदा १६, श्रीरामपूर ५२ आणि इतर जिल्हा ८ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजन चाचणीत आज ३९८ जण बाधित आढळून आले. यात नगर शहर ८, अकोले ३३, जामखेड १३, कर्जत ४४, कोपरगाव २६, नगर ग्रामीण १७, नेवासा ४२, पारनेर २१, पाथर्डी ६४, राहाता १०, राहुरी १९, संगमनेर २१, शेवगाव १८, श्रीगोंदा २६, श्रीरामपूर ३३, कँटोन्मेंट बोर्ड १ आणि इतर जिल्हा २ अशा रुग्णांचा समावेश आहे.