पुढील काळात मंत्री, मुख्यमंत्री तरुण आमदारांमधून मिळेल-बाळासाहेब थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 12:35 PM2020-01-17T12:35:44+5:302020-01-17T12:36:14+5:30

राज्याला पुढील मंत्री या तरुण आमदारांमधूनच मिळेल, अशी अपेक्षा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. 

In the coming days, the Chief Minister will get from the young MLAs - Balasaheb Thorat |  पुढील काळात मंत्री, मुख्यमंत्री तरुण आमदारांमधून मिळेल-बाळासाहेब थोरात

 पुढील काळात मंत्री, मुख्यमंत्री तरुण आमदारांमधून मिळेल-बाळासाहेब थोरात


संगमनेर : राज्याला पुढील मंत्री या तरुण आमदारांमधूनच मिळेल, अशी अपेक्षा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. 
 अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने शुक्रवारी आयोजित केलेल्या मेधा-२०२० युवा संस्कृतीत महोत्सवात संवाद तरुणाईशी या कार्यक्रमात बाळासाहेब थोरात बोलत होते. ते पुढे म्हणाले, अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात येणारा मेधा महोत्सव राज्यात नावाजलेला महोत्सव आहे. 
भविष्यात राज्याचे नेतृत्व करणारे नेते समोर आहेत. विधानसभेत प्रथमच निवडून आलेल्या तरुण व उच्च शिक्षित आमदारांमध्ये राज्याचे व देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे, असे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

Web Title: In the coming days, the Chief Minister will get from the young MLAs - Balasaheb Thorat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.