नगरमधील उड्डाणपुलाच्या भूपृष्टीय तपासणी कामाचा शुभारंभ; काम वळेत पूर्ण होईल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 03:03 PM2020-07-29T15:03:41+5:302020-07-29T15:05:02+5:30

नगर-पुणे रोडवरील वाहतुकीचा प्रश्न सुटण्यासाठी महत्वाचा असलेला उड्डाण पुलाच्या सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. खासदार व लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या पाठपुरावामुळे हे काम सुरु झाले आहे. हा उड्डाण पूल वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केला.

Commencement of surface inspection work of flyover in the town; The work will be completed in turn. | नगरमधील उड्डाणपुलाच्या भूपृष्टीय तपासणी कामाचा शुभारंभ; काम वळेत पूर्ण होईल..

नगरमधील उड्डाणपुलाच्या भूपृष्टीय तपासणी कामाचा शुभारंभ; काम वळेत पूर्ण होईल..

अहमदनगर : शहरातील नगर-पुणे रोडवरील वाहतुकीचा प्रश्न सुटण्यासाठी महत्वाचा असलेला उड्डाण पुलाच्या सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. खासदार व लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या पाठपुरावामुळे हे काम सुरु झाले आहे. हा उड्डाण पूल वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केला.

उड्डाण पुलाच्या भूपृष्टीय तपासणी कामाचा शुभारंभ बुधवारी (२९ जुलै) सकाळी नगर-पुणे रोडवरील शक्कर चौकात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार यांच्या हस्ते झाला. यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे अधीक्षक अभियंता प्रफ्फुल दिवाण, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, सहाय्यक अभियंता दिग्विजय पाटणकर, मुजीब सय्यद, श्रीकांत लोखंडे आदी उपस्थित होते. 

    अधिक्षक अभियंता प्रफ्फुल दिवाण म्हणाले, उड्डाण पुलाच्या कामासाठी भूपृष्टीय तपासणी होणे आवश्यक असल्याने या कामाचा शुभारंभ आज झाला आहे. जमिनी खाली कोणत्या प्रकारचा खडक आहे. किती मुरूम आहे हे ड्रिल करून तपासणी करीत आहे. साधारपणे ९६ ते १०० खांब पुलासाठी उभारण्यात येणार आहेत. या प्रत्येक खांबांच्या खालच्या खडकाची तपासणी होणे गरजेचे आहे. यासाठी साधारण एक महिना लागणार आहे. त्यानंतर खांबांची डिझाईन तयार होऊन पुलाच्या पायाभरणी कामास सुरवात होईल. त्यानंतर पुलाच्या प्रत्यक्ष कामास सुरवात होईल.
 

Web Title: Commencement of surface inspection work of flyover in the town; The work will be completed in turn.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.