नागवडे कारखान्याची सर्वसामान्यांशी बांधीलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:26 AM2021-07-07T04:26:12+5:302021-07-07T04:26:12+5:30
श्रीगोंदा : बापूंच्या विचारांना व संस्काराला तडा जाऊ देणार नाही. सर्वसामान्य जनतेची बांधीलकी स्वीकारून यापुढील काळात कारखान्याचा नावलौकिक वाढविण्यासाठी ...
श्रीगोंदा : बापूंच्या विचारांना व संस्काराला तडा जाऊ देणार नाही. सर्वसामान्य जनतेची बांधीलकी स्वीकारून यापुढील काळात कारखान्याचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली.
नागवडे कारखान्याच्या २०२१-२२ गाळप हंगामाच्या मिल रोलर पूजनप्रसंगी ते बोलत होते. राजेंद्र नागवडे, अनुराधा नागवडे, उपाध्यक्ष युवराज चितळकर यांच्या हस्ते मिल रोलरचे पूजन झाले. यावेळी ते बोलत होते.
नागवडे म्हणाले, कोरोना महामारीत मदतीसाठी नागवडे कारखाना अग्रेसर राहिला. तालुक्यातील प्रत्येक गावाला १० हजार रुपये, तर श्रीगोंदा नगरपालिकेला ५० हजार रुपये आर्थिक मदत दिली. श्रीगोंदा येथे कोविड सेंटर सुरू केले. ग्रामीण रुग्णालयास ऑक्सिजन यंत्रणा व बायटॅफ दिले. येत्या गळीत हंगामात १० लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असल्याचे नागवडे यांनी सांगितले.
यावेळी अरुण पाचपुते, संचालक सुभाष शिंदे, विजय कापसे, शरद खोमणे, सचिन कदम, ॲड. सुनील भोस, अंजली रोडे, सुरेखा लकडे, विश्वनाथ गिरमकर, प्रा. सुनील माने, विलासराव काकडे, श्रीनिवास घाटगे, कार्यकरी संचालक रमाकांत नाईक उपस्थित होते.
सांस्कृतिक मंडळाचे सचिव बाळासाहेब लगड यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन भाऊसाहेब बांदल यांनी केले. किसनराव कोल्हटकर यांनी आभार मानले.