शेतकऱ्याऐवजी कंपन्‍या योजनेच्‍या लाभार्थी बनल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:19 AM2021-02-07T04:19:37+5:302021-02-07T04:19:37+5:30

राज्‍यात सुरू करण्‍यात आलेली हवामानावर आधारित पीकविमा योजना खासगी कंपन्‍यांच्‍या ताब्‍यात गेल्‍याने शेतकऱ्यांऐवजी कंपन्‍या योजनेच्‍या लाभार्थी बनल्या असल्‍याची ...

Companies became beneficiaries of the scheme instead of farmers | शेतकऱ्याऐवजी कंपन्‍या योजनेच्‍या लाभार्थी बनल्या

शेतकऱ्याऐवजी कंपन्‍या योजनेच्‍या लाभार्थी बनल्या

राज्‍यात सुरू करण्‍यात आलेली हवामानावर आधारित पीकविमा योजना खासगी कंपन्‍यांच्‍या ताब्‍यात गेल्‍याने शेतकऱ्यांऐवजी कंपन्‍या योजनेच्‍या लाभार्थी बनल्या असल्‍याची खंत माजी मंत्री आमदार राधाकृष्‍ण विखे यांनी व्‍यक्‍त केली.

तालुक्‍यातील गोगलगाव विविध कार्यकारी संस्‍थेच्‍या नूतन इमारतीचे उद‌्घाटन विखे यांच्‍या हस्‍ते झाले. यावेळी विखे बोलत होते.

जेष्‍ठ नेते आणि जिल्‍हा सहकारी बँकेचे संचालक अण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या या कार्यक्रमास सोसायटीचे चेअरमन नामदेव पांढरकर, रावसाहेब मगर, सहायक निबंधक जितेंद्र शेळके, तालुका विकास आधिकारी उत्‍तम गुळवे उपस्थित होते.

विखे म्‍हणाले, राज्‍यातील शेतकरी कर्जमुक्‍त व्‍हावा म्‍हणून दोन वेळा कर्जमाफी योजना जाहीर करण्‍यात आली. सेवा सोयायटीच्‍या माध्‍यमातून या योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळाला असला तरी, कर्जमुक्‍तीच्‍या जोखडातून अद्यापही सर्व शेतकरी मुक्‍त झालेले नाहीत. कर्जमाफी ही सातत्‍याने मिळेल, अशी परिस्थिती आता नाही. यासाठीच राज्‍यात कृषिमंत्री म्‍हणून काम करीत असताना शेतकऱ्यांसाठी हवामानावर आधारित पीकविमा योजनेची अंमलबजावणी सरकारच्‍याच कृषी विमा कंपनीतून सुरू करण्‍यात आली होती.

नैसर्गिक आपत्तीमध्‍ये शेती पिकांच्‍या होणाऱ्या नुकसानीची भरपाई या योजनेतून शेतकऱ्यांना मिळाली हा दृष्‍टिकोन प्राधान्‍याने ठेवण्‍यात आला होता. काळाच्‍या ओघात ही योजना आता खासगी विमा कंपनीच्‍या ताब्‍यात गेल्‍याने शेतकऱ्यांना लाभ कमी आणि कंपन्‍यांचा फायदा अधिक होत असल्‍याच्‍या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्‍त होऊ लागल्‍या आहेत. यासाठी या योजनेचा पुन्‍हा एकदा गांभिर्याने फेरविचार करून पी‍कविमा योजनेतून शेतकऱ्यांना फायदा कसा होईल, हे पाहण्‍याची गरज निर्माण झाली आहे. जिरायती आणि बागायती भागातील पीक पद्धतीत आता नैसर्गिक कारणाने बदल होत आहेत.

याप्रसंगी माजीमंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, सहायक उपनिबंधक जितेंद्र शेळके यांची भाषणे झाली.

प्रयोग शाळेतील संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहचावे, हीच कृषी विज्ञान केंद्र काढण्‍याची संकल्‍पना होती. शेती क्षेत्रातील बदलांचा तरुणांनी आता स्वीकार करावा, यासाठी प्रवरा कृषी केयर ॲप सुरू करण्‍यात आले असून, या माध्‍यमातून गटशेती, फार्मस प्रोट्युसर कंपन्‍यांचा प्रयोग आपल्‍या भागामध्‍ये यशस्‍वीपणे सुरू केल्‍यास तो कृषी क्षेत्राला पूरक ठरेल, असे त्‍यांनी सांगितले. याप्रसंगी माजी मंत्री अण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, सहायक उपनिबंधक जितेंद्र शेळके यांची भाषणे झाली.

Web Title: Companies became beneficiaries of the scheme instead of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.