नुकसान झालेल्या व्यावसायिकांना भरपाई द्या : कोपरगावातील पूरग्रस्तांचे तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 06:27 PM2019-08-23T18:27:58+5:302019-08-23T18:28:02+5:30

गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे या महापुराचे पाणी कोपरगाव शहरातील नागरी वसाहतीमध्ये व छोट्या मोठ्या व्यावसायिकांच्या दुकानात शिरल्यामुळे या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले.

Compensate Damaged Professionals: Report to Tehsildar of Kopargaon flood victims | नुकसान झालेल्या व्यावसायिकांना भरपाई द्या : कोपरगावातील पूरग्रस्तांचे तहसीलदारांना निवेदन

नुकसान झालेल्या व्यावसायिकांना भरपाई द्या : कोपरगावातील पूरग्रस्तांचे तहसीलदारांना निवेदन

कोपरगाव : गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे या महापुराचे पाणी कोपरगाव शहरातील नागरी वसाहतीमध्ये व छोट्या मोठ्या व्यावसायिकांच्या दुकानात शिरल्यामुळे या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे नुकसानीची तातडीने भरपाई द्यावी, अशा आशयाचे निवेदन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहरातील पूरग्रस्त व्यापाऱ्यांनी तहसीलदार व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी योगेश चंद्रे यांना देण्यात आले.
गोदावरी नदीला आलेल्या महापुराचे पाणी कोपरगाव शहरातील ३८५ दुकानांमध्ये शिरले होते. त्यामुळे या दुकानांमधील व्यावसायिकांचा मालाचे नुकसान होऊन फर्निचर भिजल्यामुळे या व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून हे पुन्हा वापरा योग्य राहिलेले नाही. एकीकडे व्यावसायात मंदी व दुसरीकडे महापुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीमुळे व्यापाऱ्यांना नवीन माल खरेदी करून नव्याने फर्निचर तयार करावे लागणार आहे. महापुराच्या पाण्याने नुकसान झालेल्या सर्व दुकानांचे पंचनामे झाले असून आजपर्यंत व्यावसायिकांना कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. ज्याप्रमाणे कोल्हापूर, सांगली या ठिकाणी नुकसान भरपाई देण्यात येत आहे त्याप्रमाणे आम्हालाही लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी असे दिलेल्या निवेदनात पूरग्रस्त व्यापाºयांनी म्हटले आहे.
सुनील गंगूले, सुनील शिलेदार, रमेश गवळी, राहुल देवळालीकर, संतोष शेलार, रावसाहेब साठे, कैलास उदावंत, पियुष विसपुते, अक्षय भडकवाडे, अंबादास निकुंभ, प्रकाश दुशिंग, प्रकाश बोरसे, सुभाष विसपुते, देविदास विसपुते, योगेश उदावंत, अमित पोरवाल, मनोज विसपुते, कैलास कदम, दीपक वर्मा, अनिल आमले, दिलीप हिंगमीरे, सुनील आमले, अनवर शेख, सचिन विसपुते, नितीन निकुंभ, वीरेंद्र विसपुते, गुरूदीप सिंग, शिवाजी कदम, अल्ताफ शेख, मोहन यशवंत, भाऊसाहेब सुपेकर, बापू कुंदे, अब्बास शेख, विजय बाविस्कर, महावीर सोनी, किरण वडनेरे, विठ्ठल धुमाळ, संतोष परदेसी, दिलीप उकिरडे, विमलकुमार गुप्ता, सचिन भडकवाडे, अविनाश भडकवाडे आदी उपस्थित होते.
 

 

Web Title: Compensate Damaged Professionals: Report to Tehsildar of Kopargaon flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.