पेव्हिंग ब्लॉकचे काम दुसरीकडे पळविल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:25 AM2021-08-28T04:25:24+5:302021-08-28T04:25:24+5:30

आ. रोहित पवार यांनी जुन्या रस्त्याच्या मागणीचा विचार करून खर्डा येथील सेंट्रल बँक ते कोष्टी गल्लीपर्यंत काँक्रिटीकरण करून त्यावर ...

Complaint that the work of paving block was diverted | पेव्हिंग ब्लॉकचे काम दुसरीकडे पळविल्याची तक्रार

पेव्हिंग ब्लॉकचे काम दुसरीकडे पळविल्याची तक्रार

आ. रोहित पवार यांनी जुन्या रस्त्याच्या मागणीचा विचार करून खर्डा येथील सेंट्रल बँक ते कोष्टी गल्लीपर्यंत काँक्रिटीकरण करून त्यावर पेव्हिंग ब्लॉक टाकण्यासाठी १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्या अनुषंगाने सरपंच आसाराम गोपाळघरे व राष्ट्रवादीच्या इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला व त्या पध्दतीने कामही सुरू झाले. काम निम्म्यापर्यंत पूर्ण झाले असता, ग्रामपंचायतीच्या काही सदस्यांनी दुसरीकडे गरज नसलेल्या ठिकाणी हे राहिलेले काम पळविण्याचा उद्योग ठेकेदार व अधिकाऱ्यांवर दबाव टाकून केला. राजकीय हेव्यादेव्यातून हे काम पूर्ण करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे येथील संतप्त रहिवाशांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. हे काम ठरल्याप्रमाणे सेंट्रल बँक ते कोष्टी गल्लीपर्यंत करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे स्थानिक नागरिकांनी केली आहे.

निवेदनावर शरद गुरसाळी, नितीन गुरसाळी, डॉ. दत्ता खोत, नवनाथ खोत, भरत नवले, शशिकला गुरसाळी, प्रीती गुरसाळी, मुकेश काळे, राहुल तळेकर, कृष्णा काकडे, अमोल नवले व दत्तराज पवार यांच्या सह्या आहेत.

Web Title: Complaint that the work of paving block was diverted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.