डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण अवघडच; हीच गती राहिली तर उजाडणार २०२३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:18 AM2021-05-30T04:18:32+5:302021-05-30T04:18:32+5:30

डिसेंबर २०२१ पर्यंत संपूर्ण देशाचे लसीकरण होणार, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नुकतेच केले. मात्र लसीकरणाची सध्याची ...

Complete vaccination by December is difficult; If this pace continues, 2023 will dawn | डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण अवघडच; हीच गती राहिली तर उजाडणार २०२३

डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण अवघडच; हीच गती राहिली तर उजाडणार २०२३

डिसेंबर २०२१ पर्यंत संपूर्ण देशाचे लसीकरण होणार, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नुकतेच केले. मात्र लसीकरणाची सध्याची गती पाहता ते अशक्य असून हीच गती राहिली तर संपूर्ण लसीकरणासाठी २०२३ साल उजाडेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. नगर जिल्ह्यात १६ जानेवारीला लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात केवळ आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येत होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यात आली व ४४ वर्षांपुढील सर्वांना लसीकरण सुरू झाले. मात्र मुबलक प्रमाणात लस उपलब्ध होत नसल्याने सध्या लसीकरण कासवगतीने सुरू आहे.

नगर जिल्ह्याची सध्याची लोकसंख्या ५० लाख गृहित धरली तर सध्या केवळ ५ लाख २४ हजार (१० टक्के) नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे. लसीकरणाची हीच गती राहिली तर डिसेंबर २०२१ पर्यंत केवळ ३० टक्के लसीकरण पूर्ण होईल. या हिशेबाने संपूर्ण लसीकरण होण्यासाठी २०२३ साल उजाडेल.

-------------

२७ मे पर्यंत झालेले लसीकरण

पहिला डोस दुसरा डोस

आरोग्य कर्मचारी - २६१११ १७९८८

फ्रंटलाईन - १०१६७ ६१२०

ज्येष्ठ नागरिक

४५‌‌ ‌‌‌‌वर्षांपुढील सर्व) ‌‌‌‌‌‌- ४६३४८२ १३५७८५

---------------

लसीकरणाची गती (पहिला डोस)जानेवारी - २५७९९

फेब्रुवारी - ५१,५६०

मार्च - १९५५३६

एप्रिल - ३८४११०

मे (२९ मेपर्यंत) - ५२४६६०

-----------

१८पेक्षा कमी वयाचे काय?

१८पेक्षा कमी वयोगटासाठी अद्याप लस जाहीर झालेली नाही. नगर जिल्ह्यात ही लोकसंख्या सुमारे १७ लाख (३४ टक्के) आहे. यांचे लसीकरण सुरू झाल्यानंतर हीच गती राहिली तर ते लसीकरण पूर्ण होण्यास वर्षभराचा कालावधी लागेल

------------

लसीकरण केंद्र १००लसीकरणासाठी जिल्ह्यात सुरुवातीला २० ते ३० केंद्र होते. नंतर त्यात वाढ करून ती दीडशेपर्यंत नेण्यात आली. परंतु आता लस उपलब्धतेनुसार लसीकरण केंद्रांची संख्या ठरवली जाते. सुमारे २० हजार लस दिवसभरासाठी उपलब्ध असेल तर १०० ते ११० लसीकरण केंद्र कार्यरत केले जातात.

---------

Web Title: Complete vaccination by December is difficult; If this pace continues, 2023 will dawn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.