जलशक्ती अभियानाची कामे आॅगस्टअखेर पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 03:52 PM2019-07-21T15:52:56+5:302019-07-21T15:55:13+5:30
जलशक्ती अभियानांतर्गत जिल्ह्यातील पाच तालुक्यांत सुरू असलेली कामे आॅगस्टअखेर पूर्ण करा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी संबंधित मुख्याधिकाऱ्यांना दिल्या.
अहमदनगर : जलशक्ती अभियानांतर्गत जिल्ह्यातील पाच तालुक्यांत सुरू असलेली कामे आॅगस्टअखेर पूर्ण करा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी संबंधित मुख्याधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात जलशक्ती अभियानांतर्गत नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) जितेंद्र वाघ, नगरपालिका शाखा जिल्हा प्रशासन अधिकारी शरद घोरपडे व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
या हद्दीत विहिरी आणि विंधनविहिरी पुनर्भरण, रेनवॉटर हार्वेस्टींग आणि वृक्षलागवड कामाची जी उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत, ती सर्व कामे ३० आॅगस्टपर्यंत पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या.
जलशक्ती अभियानाची माहिती नगरपरिषदेच्या स्तरावर होण्यासाठी नगराध्यक्षांसमवेत महासभा घेऊन जलदिंडी काढण्यात यावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
नगर परिषदेने केलेल्या कामाची माहिती संकेतस्थळावर अपलोड करावी व जलशक्ती अभियानाची सर्व कामे ३० आॅगस्टअखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या.
जलशक्ती अभियानात पाच तालुक्यांचा समावेश
जलशक्ती अभियानांतर्गत जिल्ह्यातील संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी, राहाता, कोपरगाव, शिर्डी आणि देवळाली प्रवरा या नगरपरिषदांचा समावेश करण्यात आला आहे.