सामाजिक संघटनांच्या स्वच्छता अभियानाचे द्विशतक पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:20 AM2021-04-21T04:20:39+5:302021-04-21T04:20:39+5:30
कर्जत नगरपंचायतीने स्वच्छ सर्व्हेक्षण २०२१ मध्ये सहभाग घेतला आहे. कर्जत शहरातील विविध सामाजिक संघटनांनी गेल्या दोनशे दिवसात अविरतपणे स्वच्छता ...
कर्जत नगरपंचायतीने स्वच्छ सर्व्हेक्षण २०२१ मध्ये सहभाग घेतला आहे. कर्जत शहरातील विविध सामाजिक संघटनांनी गेल्या दोनशे दिवसात अविरतपणे स्वच्छता अभियान राबवत आहेत. कर्जत शहर व तालुक्यातील विविध भागात मोठय़ा प्रमाणावर कोरोनाचे रूग्ण सापडत आहेत. कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाची चाचणी केली जाते आहे. या भागात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कोरोनाच्या संकटानंतर मात करण्यासाठी दिवसभर झटणारे अधिकारी पद, प्रतिष्ठा व ताण हे सर्व बाजूला ठेवून कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळेे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदीप पुंड, कर्जत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव हे या स्वच्छता अभियान सहभागी झाले होते.
स्वच्छतादूत समवेत या अधिकाऱ्यांनी कचरा उचलण्याचे काम केले. कोविडची तपासणी असलेल्या ठिकाणी पडलेल्या पाण्याच्या बाटल्या, नाश्त्याची पाकिटे, अर्धवट जेवणाच्या फेकलेल्या पिशव्या गोळा करण्याचे काम केले.
फोटो - कर्जत
कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयातील घातक कचरा उचलताना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड, कर्जत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव