लोकअदालतमध्ये २ हजार ७७३ प्रकरणांची तडजोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:34 AM2020-12-14T04:34:03+5:302020-12-14T04:34:03+5:30
जिल्हा न्यायालयात शनिवारी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्या उपस्थित लोकअदालतचे कामकाज सुरू झाले. यावेळी जिल्हा न्यायाधीश ...
जिल्हा न्यायालयात शनिवारी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्या उपस्थित लोकअदालतचे कामकाज सुरू झाले. यावेळी जिल्हा न्यायाधीश अशोककुमार भिल्लारे, न्या. ए. एम. शेटे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या. रेवती देशपांडे, जिल्हा सरकारी वकिल ॲड. सतीश पाटील, सेन्ट्रल बार असोशिएशनचे अध्यक्ष ॲड. सुभाष काकडे, शहर वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. भूषण ब-हाटे आदींसह सर्व न्यायिक अधिकारी, पॅनल सदस्य वकील व कर्मचारी उपस्थित होते. कोव्हीड १९ रोगाचा प्रादुर्भाव असतांना देखील जिल्हाभरात लोकअदालतीस प्रतिसाद मिळाला. जिल्हा व तालुका स्तरावर झालेल्या लोकअदालतमध्ये नगर जिल्हा न्यायालयात दिवाणी प्रकरणे, फौजदारी, एन. आय. ॲक्ट प्रकरणे, बँकांच्या कर्ज वसुली प्रकरणी, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कामगार कायद्याखालील प्रकरणे, कौटुंबिक वादाची आदी प्रकरणे ठेवण्यात आली होती. प्राधिकरणाच्या सचिव देशपांडे म्हणाल्या न्यायालयाचे कामकाज आता पूर्व पदावर आले आहे. दीर्घ काळानंतर आयोजन करण्यात आल्याने पक्षकार व वकिलांनी चांगला प्रतिसाद लोकन्यायालयास दिला आहे. सर्वांचे करोना पासून संरक्षणाची पूर्णपणे खबरदारी घेण्यात आली आहे. कोर्ट हॉल मध्ये गर्दी होवू नये यासाठी वेगळ्या उपाययोजना राबवयात आल्या आहेत. यावेळी ॲड. ब-हाटे, ॲड. काकडे यांनी मनोगत व्यक्त केले.
फोटो १३ लोकअदालत
ओळी- जिल्हा न्यायालयात झालेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयात मार्गदर्शन करतांना जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर. समवेत जिल्हा न्यायाधीश अशोककुमार भिल्लारे, ॲड. सतीश पाटील, ॲड. भूषण ब-हाटे, ॲड. सुभाष काकडे आदी.