कोविड केअर सेंटर सुरु झाल्याने चिंता मिटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:19 AM2021-03-18T04:19:18+5:302021-03-18T04:19:18+5:30

कोपरगाव : शहरातील एस. एस. जी. एम. महाविद्यालयात प्रशासनाच्यावतीने १५० बेडचे सुसज्ज कोविड केअर सेंटर सुरु झाले आहे. यामुळे ...

Concerns have been allayed with the launch of the Covid Care Center | कोविड केअर सेंटर सुरु झाल्याने चिंता मिटली

कोविड केअर सेंटर सुरु झाल्याने चिंता मिटली

कोपरगाव : शहरातील एस. एस. जी. एम. महाविद्यालयात प्रशासनाच्यावतीने १५० बेडचे सुसज्ज कोविड केअर सेंटर सुरु झाले आहे. यामुळे कोपरगावमधील रुग्णांना उपचारासाठी कोपरगावबाहेर जाण्याची चिंता मिटली आहे. यासंदर्भात सातत्याने मागणी करीत होते. परंतु, उशिरा का होईना दखल घेतली हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत असल्याचे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी म्हटले आहे.

कोपरगाव मतदार संघामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची सुरुवात झाल्यापासूनच डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरची, रुग्णसेवा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी आपण १५ फेब्रुवारीला एका निवेदनाद्वारे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत जिल्हा प्रशासनाने तसेच तहसीलदार योगेश चंद्रे यांनी कोरोनाबाधित रुग्णांवर कोपरगावात उपचार करण्यासाठी एस. एस. जी. एम. महाविद्यालयात १५० बेडच्या सुसज्ज कोविड केअर सेंटरची उभारणी केली आहे. यामुळे कोपरगावमधील रुग्णांना उपचारासाठी कोपरगावबाहेर जाण्याची चिंता मिटली आहे.

Web Title: Concerns have been allayed with the launch of the Covid Care Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.