हरेगाव येथील मतमाउली यात्रौत्सवाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:23 AM2021-09-23T04:23:38+5:302021-09-23T04:23:38+5:30
कोविड नियमांमुळे यंदा यात्रौत्सव भरला नाही. केवळ प्रमुख धर्मगुरूंच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम पार पडले. प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे, व्हीकर ...
कोविड नियमांमुळे यंदा यात्रौत्सव भरला नाही. केवळ प्रमुख धर्मगुरूंच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम पार पडले. प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे, व्हीकर जनरल वसंत सोज्वळ, डॉमनिक रिचर्ड, सचिन मुन्तोडे, जीवन येवले, व्हिक्टर बोर्डे यांनी प्रार्थना व विधीवत पूजा केली. धर्मगुरू सुरेश साठे यांच्या हस्ते यात्रेपूर्वी नऊ शनिवार नोव्हेना घेण्यात आली. फादर ऐरल फर्नांडीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करून जन्मोत्सवास प्रारंभ झाला. त्यानंतर दररोज धर्मगुरूंचे विविध विषयांवर प्रवचन झाले. बुधवारी दुपारी १२ वाजता नाशिक धर्मप्रांत महागुरुस्वामी लुईस डानियल यांचे पवित्र मारियाच्या जीवनावर सविस्तर मार्गदर्शन झाले.
सलग दुसरे वर्षे यात्रा भाविकांविना पार पडली. तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे, उपनिरीक्षक अतुल बोरसे यांनी बंदोबस्त ठेवला. सरपंच सुभाष बोधक, अमोल नाईक, मंदाकिनी गाडेकर यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले. तहसीलदार प्रशांत पाटील यांनी आढावा घेतला.