आंबेडकर मैदानाच्या काँक्रिटीकरणाचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:21 AM2021-01-20T04:21:39+5:302021-01-20T04:21:39+5:30

कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाशेजारील डॉ. आंबडेकर मैदान येथे प्रशस्त जागा आहे. या मैदानावर ...

Concreting of Ambedkar ground stalled | आंबेडकर मैदानाच्या काँक्रिटीकरणाचे काम रखडले

आंबेडकर मैदानाच्या काँक्रिटीकरणाचे काम रखडले

कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाशेजारील डॉ. आंबडेकर मैदान येथे प्रशस्त जागा आहे. या मैदानावर शहरासह तालुक्यातील विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. त्यामुळे या मैदानाचे मोठे महत्त्व आहे. त्यासाठी नगर परिषदेने सुशोभीकरण करण्यासाठी १८ लाख खर्चाचे काँक्रिटीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्याचे उद्‌घाटन झाले आहे; परंतु अद्यापपर्यंत काम सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे हे काम तात्काळ सुरू करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

दरम्यान, डिसेंबर महिन्यात याच विकासकामाचे भूमिपूजन झाल्यानंतर रात्रीतून अज्ञातांनी समारंभाचे फलक फाडले होते. या फलकावर आमदार आशुतोष काळे व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचे नाव होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने याचे चांगलेच भांडवल केले होते. त्यामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते; परंतु या उद्‌घाटनाला तीन आठवडे उलटूनही प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे फलक फाडल्याच्या रागातून तर हे काम रखडले नाही ना? अशी चर्चा सध्या शहरात होत आहे.

......................

फोटो ओळी –

कोपरगाव शहरातील आंबेडकर मैदानाचे काँक्रिटीकरणाचे काम रखडल्याने येथील खडी, वाळू यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. (छायाचित्र : रोहित टेके)

....

फोटो१९-कोपरगाव

Web Title: Concreting of Ambedkar ground stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.