शुद्धलेखन ऑनलाइन कार्यशाळा संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:20 AM2021-04-21T04:20:42+5:302021-04-21T04:20:42+5:30
शिक्षणशास्त्र महाविद्यालयात मंगळवारी (दि. २०) भावी शिक्षकांसाठी आयोजित ‘एका तासात करूया नव्वद टक्के भाषा शुद्ध’ या ऑनलाइन पद्धतीने ...
शिक्षणशास्त्र महाविद्यालयात मंगळवारी (दि. २०) भावी शिक्षकांसाठी आयोजित ‘एका तासात करूया नव्वद टक्के भाषा शुद्ध’ या ऑनलाइन पद्धतीने आयोजित मराठी शुद्धलेखन कार्यशाळेत ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. भालचंद्र भावे, कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. राजू शेख उपस्थित होेते.
व्याकरणाचे नियम, बाराखडी, कंठाचे प्रयोग, उच्चारणशास्त्र, अनुस्वार, व्यंजन, ऱ्हस्व, दीर्घ, भाषेचे नियम, मराठीतील नवीन शब्द, जोडशब्द, कोणत्या शब्दांना आघात देणे आवश्यक आहे. अशी विविध भाषेच्या पैलूंवर बोलताना डॉ. मालपाणी यांनी मराठी भाषेतील शुद्धलेखन विशद केले. शिक्षकांनी नेहमी मराठी भाषेचा उपयोग शुद्ध रूपात केला पाहिजे, एक शिक्षक चुकला तर पूर्ण वर्ग चुकतो, त्यासाठी भाषेचे नियम प्रत्येकाने आत्मसात करावे, असे आवाहन त्यांनी केले. इकारयुक्त, उकारयुक्त नियमांचे महत्त्व भाषेत असतात. त्यासाठी प्रत्येकाने भाषेचे महत्त्व समजून घ्यावे, असेही ते म्हणाले. या कार्यशाळेत तीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रास्ताविक डाॅ. भावे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. नयना पंजे यांनी केले. प्रा. ज्योती मेस्त्री यांनी आभार मानले.