संघर्ष अन अवहेलनेचा लास्ट स्टॉप

By नवनाथ कराडे | Published: November 14, 2017 11:59 AM2017-11-14T11:59:21+5:302017-11-14T12:06:14+5:30

पृथ्वीतलावर तसूभरही जागेची मालकी स्वत:च्या नावावर नसणा-यांना जगण्यासाठी करावा लागणारा संघर्ष अन निवा-यासाठी लागणा-या जागेसाठी सातत्याने होणारी अवहेलना लास्ट स्टॉप या नाटकातून मांडण्यात आली आहे

Conflict unexplained last stop | संघर्ष अन अवहेलनेचा लास्ट स्टॉप

संघर्ष अन अवहेलनेचा लास्ट स्टॉप

ठळक मुद्देनाट्यसमीक्षण

नवनाथ खराडे
अहमदनगर : पृथ्वीतलावर तसूभरही जागेची मालकी स्वत:च्या नावावर नसणा-यांना जगण्यासाठी करावा लागणारा संघर्ष अन निवा-यासाठी लागणा-या जागेसाठी सातत्याने होणारी अवहेलना लास्ट स्टॉप या नाटकातून मांडण्यात आली आहे. हा संघर्ष आणि अवहेलना प्रेक्षकांपर्यत यशस्वी अन प्रभावीपणे पोहोचविण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे. या संपुर्ण नाटकात अभय खोले यांनी अप्रतिम असा साकारलेला रंगा नावाचा वेडा नक्कीच प्रेक्षकांच्या कायमस्वरुपी लक्षात राहिल.  


राज्य नाट्य स्पर्धेत रविवारी नगर तालुका ग्रामीण कला क्रीडा अकादमी देऊळगाव सिध्दी निर्मित लास्ट स्टॉप हे नाटक सादर करण्यात आले. नाटकाचे लेखन बाळासाहेब चव्हाण यांनी केले असून दिग्दर्शन काशिनाथ सुलाखे पाटील यांनी केले आहे. भटक्या लोकांच्या आयुष्यावर आधारित हे नाटक. नाना - नानीचे एक कुटुंब. या दोघांच्या मालकीची धरतीवर तसूभरही जागा नसल्यानं बसस्थानकच्या लगत तळवटाच्या झोपडीत उभारलेला संसार. नानी भंगार अन कागदं गोळा करुन पोट भरती तर नाना संसारासाठी लंगडा असल्याने भिक मागतो. फुली नावाची लग्न झालेली लेकही त्यांना असते. नानीच्या आस-याला रंगा नावाचा वेडा आश्रयाला असतो. रंगा सातत्याने वेगवेगळ्या भुमिका जगत असतो. या भुमिकेच्या माध्यमातून समाजातील सत्यतेवर रंगा नेमणेपणाने भाष्य करतो. नाना - नानीनं दिलेल्या शिळ्यापाक्यावर रंगा जगतो. फुलीचा नवरा गुन्हेगार निघाल्याने नानी कायमचीच फुलीला आपल्याकडे घेऊन येते. नानीला स्वत:चे पोट भरत नसल्याची काळजी असतेच त्यात फुलीलाही दिवस गेल्यानं तिच्या काळजीत आणखीच वाढ झालेली असते. त्यातच धंदा चांगला होत नसल्याने जागेचे भाडेही थकते. एक गावगुंड नेता त्यांच्याकडून जागेचे भाडे बळकावत असतो. अनेक पक्षांच्या आंदोलनावेळी हक्काची माणसे म्हणून नाना -नानींकडे पाहिले जाते. दरम्यान फुलीचे बाळंतपण जवळ आलेले असते. अशातच शहरात मुख्यमंत्र्याचा दौरा असतो. नाना-नानीच्या झोपडीजवळच्या रस्त्यावरून मुख्यमंत्र्याची सवारी जाणार असल्याने झोपडी काढण्यास सांगितले जाते. मात्र फुलीचे बाळंतपण जवळ आल्याने नानीसमोर मोठा पेच निर्माण झालेला असतो. इतरत्र जागा शोधण्याचा प्रयत्नही नानी करते. पण जागा मिळत नाही. अचानक अतिक्रमण पथक झोपडी हटवण्याचा प्रयत्न करते. सगळे सामान अस्ताव्यस्त फेकले जाते. त्यानंतर या मोडक्या झोपडीतच फुलीचे बाळंतपण होते.  फुली मुलीस जन्म देते. एकीकडे उध्दस्त झालेला झोपडी अन दुसरीकडे मुलगी जन्माला आली म्हणून चेह-यावर हसू असणारे नानी-नाना अन फुली. हे वास्तव समोर ठेवत नाटकाचा शेवट होतो.


नाटकातील सर्वच भुमिका अत्यंत प्रभावीपणे प्रत्येकाने साकारल्या आहेत. मात्र प्रेक्षकांच्या अन सर्वाच्या कायमस्वरूपी लक्षात राहणारी भुमिका म्हणजे रंगा. अभय खोले यांनी वेड्या रंगाची भुमिका अप्रतिमपणे साकारली आहे. त्यांचा खास संवाद म्हणजे... अयो मामावं.....मामावं...मामावं. या भुमिकेबद्दल खोले यांचे कौतुक करावे तेवढे कमीच.नानांची भुमिका काशीनाथ सुलाखे यांनी साकारली तर नानीची भुमिका शोभा नांगरे चंदने यांनी निभावली. या दोन्ही भुमिका उत्तमपणे साकारण्यात आल्या आहेत. गौतमी आव्हाडने साकारलेली फुलीही दजेर्दार झाली आहे. राहुल जरे यांना साकारलेला बाशाही बरा. प्रा. सचिन मोरे यांनी विंचूरकर आणि डॉक्टर अशी दुहेरी भुमिका केली आहे. या दोन्ही भुमिकेत मोरे कुठे कमी पडल्याचे दिसत नाही. पाहुणा म्हणजे फुलीचा नवरा. ही भुमिका राजेश घोरपडे यांनी उत्तमपणे निभावली आहे. इन्सपेक्टरची भुमिकेत असलेले निलेश चांदणे यांना छाप पाडता आली नाही. अधिकारी असणारे प्रा. डॉ. राजेंद्र परदेशी अन त्यांच्यासमवेत असणारे बबन झोंड, सुदिप नेटके, बाबूराव काळे यांनीही अप्रतिम अतिक्रमण हटाव मोहिम साकारली आहे.
भटक्या जमातीचे असणारे सामान, संसार, बसस्थानकाची रचनेमुळे नेपथ्य उत्तम झाले आहे. संगीत बरे झाले असले तरी आणखी प्रभावीपणे करता आले असते. प्रकाशयोजनाही बरी झाली आहे. हिरामण यांची रिंगटोन वेळेच्या आधीच वाजते. काही ठिकाणी लाईट बंद होण्याची वाट कलाकार पाहतात. वेशभुषा उत्तम झाली आहे. त्यामध्येही नानाचा ड्रेस फाटका असला तरी नवाकोरा वाटत होता. रंगभूषाही उत्तम. या उत्तम सादरीकरणाच्या बळावर दिग्दर्शक प्रेक्षकांपर्यत संदेश पोहोचविण्यात नक्कीच यशस्वी झाला आहे.
 
लास्ट स्टॉप
दिग्दर्शक : काशिनाथ सुलाखे पाटील
लेखक : बाळासाहेब चव्हाण
निर्मिती : नगर तालुका ग्रामीण कला क्रिडा अकादमी, देऊळगाव सिध्दी
निमार्ता : अभिमान गायकवाड
 
पात्र  -
नाना : काशिनाथ सुलाखे पाटील
नानी : शोभा नांगरे- चांदरे
फुली : गौतमी आव्हाड
रंगा : अभय खोले
बाशा : राहुल जरे
विंचूरकर  व डॉक्टर : प्रा.सचिन मोरे
हिरामण : राम पाटोळे
पाहुणा : राजेश घोरपडे
इन्सपेक्टर : निलेश चांदणे
अधिकारी : प्रा. राजेंद्र परदेशी
हवालदार : अनिल गलांडे
साथीदार : सुदिप नेटके, बबन झोंड, बाबुराव काळे
 
तंत्रज्ञ
नेपथ्य : निलेश चांदणे, सचिन घोडके
प्रकाशयोजना : डॉ. किरण एकबोटे
संगीत : प्रविण तांबे
रंगभूषा : अनंती गोले
वेषभुषा : हनुमंत वाबळे
रंगमंच व्यवस्था : डॉ. राजेंद्र परदेशी, प्रा.विजय साबळे

Web Title: Conflict unexplained last stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.