काँग्रेस व शिवसेनेची राजकीय मैैत्री जुनीच-बाळासाहेब थोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 12:48 PM2020-03-08T12:48:52+5:302020-03-08T12:49:53+5:30
दिवंगत इंदिरा गांधी यांना आणिबाणीच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी समर्थनार्थ भूमिका घेतली. काँग्रेसच्या ए.आर.अंतुले यांना मुख्यमंत्री करण्यातही ठाकरे यांनी सहकार्य केले. त्यामुळे काँग्रेस व शिवसेनेच्या मैत्रीचे नाते जुनेच असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
श्रीरामपूर : दिवंगत इंदिरा गांधी यांना आणिबाणीच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी समर्थनार्थ भूमिका घेतली. काँग्रेसच्या ए.आर.अंतुले यांना मुख्यमंत्री करण्यातही ठाकरे यांनी सहकार्य केले. त्यामुळे काँग्रेस व शिवसेनेच्या मैत्रीचे नाते जुनेच असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीचे सरकार स्थापण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला. आम्ही दिल्ली काँग्रेसकडून सहमती घेण्यासाठी मन वळविले, असा खुलासा त्यांनी केला.
श्रीरामपूरयेथील आझाद मैदानावर दिवंगत नेते जयंत ससाणे यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त शनिवारी (दि.७ मार्च) आयोजित कार्यक्रमात मंत्री थोरात बोलत होते. खासदार सदाशिव लोखंडे, आमदार सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, उपनगराध्यक्ष करण ससाणे, सचिन गुजर, अनिल कांबळे, ज्ञानेश्वर मुरकुटे, राजश्री ससाण उपस्थित होते. थोरात पुढे म्हणाले, भाजपचे राजकारण देशाला चुकीच्या वळणावर नेणारे आहे. लोकशाहीला ते धोक्याचे होते. त्यामुळे शिवसेनेने पुढाकार घेत महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आणण्यासाठी पुढाकार घेतला. राज्यातील काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना दिल्लीतील हायकमांडशी चर्चा करण्याची मागणी केली. त्याला यश आले व राज्यात नवे सरकार अस्तित्वात आले. महाविकास आघाडी सरकारने शंभर दिवसांंचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण केला आहे. मागील सरकारने ३५ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली. मात्र केवळ भाषणाने शेतकºयांचे पोट भरले. बायकामुलांना रात्री अर्ज भरण्यासाठी रांगेत उभे केले. शेतकºयांना त्यांनी पिंजून पिंजून काढले. शेतकºयांना सतावण्याची त्यांची भूमिका होती. आमच्या सरकारने मात्र शेतकºयांना सन्मानाने कर्जमाफी दिली.
थोरात आणि मी एकाच सरकारमध्ये..
खासदार सदाशिव लोखंडे यांनी ससाणे व त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से सांगितले. ससाणे यांच्या मदतीमुळे जिल्हा सहकारी बँकेत काम करण्याची संधी मिळाली. लोकसभा निवडणुकीत महसूलमंत्री थोरात यांनी माझ्या विरोधात भाऊसाहेब कांबळे यांना मदत केली. आता मात्र थोरात व मी एका सरकारमध्ये आलो आहे. कांबळे हे मात्र दुस-या पक्षात गेले असे सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
...