काँग्रेसने केली दहाव्याचा ओटा परिसराची साफसफाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:24 AM2021-08-22T04:24:15+5:302021-08-22T04:24:15+5:30
शहर कॉंग्रेसच्या वतीने दहाव्याचा ओटा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ करत गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी हाती झाडू ...
शहर कॉंग्रेसच्या वतीने दहाव्याचा ओटा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ करत गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी हाती झाडू घेत साफसफाई केली व पालिकेच्या कारभाराचा निषेध केला.
करण ससाणे म्हणाले, पालिका सत्ताधाऱ्यांना नागरिकांच्या समस्यांची जाण नाही. दहावा ओटा परिसरात पालिकेचे लक्ष नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना विधी करताना कचरा व घाणीचा मोठा त्रास होता. पालिकेने हा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे म्हणाले, नगराध्यक्षांना स्वतःचे विचार नागरिकांवर लादण्याचे प्रयत्न करत आहेत. या कारणामुळेच दहाव्याचा ओटा दुर्लक्षित राहिला. शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय छल्लारे यांनी दहावा ओट्याच्या या दुरवस्थेमुळे दशक्रिया विधीसाठी बाहेरगावाहून येणाऱ्या नातेवाइकांच्या वाईट प्रतिक्रिया येत असल्याचा आरोप केला.
आंदोलनप्रसंगी जिल्हा कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, नगरसेवक मुज्जफर शेख, रितेश रोटे, शशांक रासकर, मनोज लबडे, सुहास परदेशी, ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डावखर, माजी नगरसेवक आशिष धनवटे, प्रदीप कुऱ्हाडे, जावेद शेख, प्रवीण नवले, रियाज पठाण, सरबजित सिंग चुग, संतोष परदेशी, रावसाहेब अल्हाट, रणजीत जामकर, मुन्ना परदेशी, नीलेश भालेराव, मंगल सिंग साळुंके, राहुल शिंपी, अतुल वढणे उपस्थित होते.
----
फोटोओळी : काँग्रेस दहाव्याचा ओटा परिसर स्वतः साफ करताना काँग्रेस कार्यकर्ते.