काँगे्रस-राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा

By Admin | Published: October 9, 2016 12:38 AM2016-10-09T00:38:07+5:302016-10-09T01:06:01+5:30

अहमदनगर : आगामी काळात राज्यात नगरपालिका, नगरपरिषद, महानगरपालिका, जिल्हापरिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत.

Congress-NCP's Swabal slogan | काँगे्रस-राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा

काँगे्रस-राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा


अहमदनगर : आगामी काळात राज्यात नगरपालिका, नगरपरिषद, महानगरपालिका, जिल्हापरिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. मिनी विधानसभेप्रमाणे होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यक र्त्यांच्या भावना समजून घेण्यात येत आहे. यात कार्यकर्त्यांची इच्छा ‘स्व’बळाची असल्याची माहिती काँग्रेस पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी व नाशिक पदवीधर मतदारसंघाचे निरीक्षक आमदार भाई जगताप यांनी नगरमध्ये दिली.
नगरपालिका, नगरपरिषद, महानगरपालिका, जिल्हापरिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुकानिहाय कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतर आ. जगताप पत्रकारांशी बोलत होते. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, आमदार भाऊसाहेब कांबळे उपस्थित होते. जगताप म्हणाले, काँग्रेस पक्षाने २८८ मतदारसंघांसाठी स्वतंत्र निरीक्षक नेमले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुका लढण्यात येणार आहेत. मात्र, नगर जिल्ह्यात निरीक्षकांसह विखे आणि आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका होतील. कार्यकर्त्यांचा आढावा घेतल्यानंतर गत पाच वर्षांत त्यांचे मनोबल वाढलेले दिसत आहे. विधानसभा, लोकसभा निवडणुकांत काँग्रेस वगळात अन्य पक्षांतील नेते भाजपात गेलेले आहेत. काँग्रेस त्याला अपवाद आहे. यंदा पक्षाला चांगली परिस्थिती आहे. यामुळे आगामी निवडणुका स्वबळावर लढवल्या जातील. कार्यक र्त्यांकडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वतंत्र लढण्याची मागणी आहे. समविचारी पक्षाशी आघाडी करण्याची वेळ आली, तरी स्थानिक नेते, कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्यात येईल. नाशिक पदवीधर मतदारसंघाची जागा काँग्रेसची आहे. त्या ठिकाणी पक्षाचा अधिकृत उमेदवार गतनिवडणुकीत विजयी झाला होता. ती जागा काँग्रेसची आहे. या जागेवर राष्ट्रवादीची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असे जगताप यांनी यावेळी ठणकावले.
१९९९ आणि २०१४ ला दोन्ही काँग्रेस स्वतंत्र लढलेले आहेत. उर्वरित निवडणुकांमध्ये दोन्ही पक्ष एकत्र लढले होते. ही एकत्रित निवडणूक प्रासंगिक करार समजावा, असे जगताप यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांची धमकीची भाषा त्या पदाला शोभत नाही. महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचा वारसा आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी कामाचा ठसा दाखवावा. स्वत:चे अपयश लपवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी धमक्यांची भाषा करू नये, असा सल्ला त्यांनी दिला. राज्यात गंभीर प्रश्न असताना मुख्यमंत्र्यांना गाणी, कविता, शेरोशायरी सुचत असल्याचा चिमटाही त्यांनी काढला.
लोणी : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका राष्ट्रवादी स्वबळावर लढविणार आहे. नगरपंचायत आणि नगरपालिकासांठी स्वतंत्र बैठक होणार असून, तयारी सुरू करा, असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते आ. दिलीप वळसे पाटील यांनी दिला़
राष्ट्रवादीची बैठक बाभळेश्वर (ता़ राहाता) येथे झाली़ यावेळी वळसे बोलत होते. अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले होते. जि़ प़ अध्यक्षा मजूषा गुंड, रावसाहेब म्हस्के, कपिल पवार, तालुका अध्यक्ष सुधीर म्हस्के, अ‍ॅड. गोकुळ धावणे, अ‍ॅड. नारायण कार्ले, सुरेंद्र खर्डे आदी उपस्थित होते.४
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या या ग्रामीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. म्हणूनच स्वबळावर लढणार आहोत. राज्यात युती शासनाने पत गमावली आहे़ शेतकरी, सामान्य जनतेला शासनाने वाऱ्यावर सोडले आहे़ तालुक्याचे अनेक प्रश्न आहेत. निळवंडे धरणाला आपण गती दिली, पण या सरकारकाडून कालव्यांसाठी निधी मिळत नाही. आता सर्वांनी कामाला लागा, पुन्हा एकहाती सत्ता आण्यासाठी मतभेद बाजूला ठेवून काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी रावसाहेब म्हस्के, अ‍ॅड. गोकुळ धावणे, सुधीर म्हस्के, उत्तमराव घोरपडे आदींची भाषणे झाली.

Web Title: Congress-NCP's Swabal slogan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.