कॉँग्रेसचे दोन नगरसेवक गायब महापौर बदलाच्या हालचाली
By Admin | Published: June 1, 2015 10:12 PM2015-06-01T22:12:38+5:302015-06-02T16:19:39+5:30
अहमदनगर: आमदार संग्राम जगताप यांनी महापौर पदाचा राजीनामा दिल्यानंतर ८ जून रोजी नव्या महापौराची निवड होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आघाडी व युतीत नगरसेवक फोडाफोडीची जणू काही स्पर्धाच सुरू झाली आहे. फोडाफोडीच्या राजकारणात युती दोन पावले पुढे गेली असून सहलीवर गेलेल्या आघाडीच्या नगरसेवकांमध्ये कॉँग्रेसच्या दोघांचा समावेश नाही. हे नगरसेवक युतीच्या गोटात सामील झाल्याची चर्चा आहे. मात्र आमचे नगरसेवक सहीसलामत असल्याचा दावा आघाडीकडून केला जात आहे.

महापौर पदाचा खांदेपालट करण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी महापौर पदाचा राजीनामा दिला. ८ जून रोजी नव्या महापौराची निवड होत आहे. आघाडीचे संख्याबळ कमी करण्यासाठी युतीने त्यांचे नगरसेवक गळाला लावले असून त्यांना गायब केले आहे. सेनेेचे नगरसेवक शनिवारी तर भाजपाचे सोमवारी मुंबई सहलीवर गेले आहेत. युतीने नगरसेवकांची फोडाफोडी सुरू केल्याचे समजाताच आघाडीने त्यांचे नगरसेवक सुरक्षितस्थळी रवाना केले. मात्र त्यात कॉँग्रेसचे दोन नगरसेवक नाहीत. कॉँग्रेसचे दोन नगरसेवक गायब झाले असून ते युतीच्या गोटात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. युतीच्या गोटातील हे नगरसेवक पुन्हा स्वगृही आणण्यासाठी आघाडीने शोधाशोध सुरू केली आहे. आघाडीचे नगरसेवक आमच्याच सोबत असून महापौर आमचाच होईल असा दावा राष्ट्रवादीकडून केला जात आहे.
.............
सहा-सहा महिन्याचा प्रस्ताव
दरम्यान आघाडीतील नाराज असलेल्या नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी सहा-सहा महिने महापौर पदाची संधी मिळावी, येणारा खर्चही विभागून द्यावा अशी मागणी आमदार जगताप यांच्याकडे केली आहे. बोराटे यांनाही महापौर होण्याची इच्छा आहे. पहिले सहा महिने कळमकर तर दुसरे सहा महिने महापौर पदाची संधी मिळावी असे बोराटे यांचे म्हणणे आहे. बोराटे यांच्या या प्रस्तावावर जगताप यांनी कोणताही निर्णय दिलेला नाही. त्यामुळे नाराज बोराटे यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचेच लक्ष लागून आहे.
.................
निरीक्षक घेणार कॉँग्रेसचा निर्णय
महापालिकेत कॉँग्रेस नगरसेवकांचे संख्याबळ ११ आहे. दोन अंकी संख्याबळ असले तरी सत्तेत फक्त उपमहापौर पद वाट्याला आले आहे. त्यातच पक्षाच्या नगरसेवकांची सत्तेत असूनही कामे होत नाही, त्यामुळे पक्षाने योग्य तो निर्णय घ्यावा असे प्रभारी शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी प्रदेशला कळविले आहे. त्यानुसार प्रदेशने निरीक्षक पाठविण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या अहवालानंतर कोणासोबत जायचे हे ठरविले जाणार असल्याचे समजते.