शहराच्या विकासासाठीच सहमती एक्स्प्रेस सुसाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:18 AM2021-01-17T04:18:13+5:302021-01-17T04:18:13+5:30
कोल्हे गटाचे नगरसेवक तसेच काही नेत्यांनी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांची सहमती एक्स्प्रेस ही सुसाट सुटली असल्याचे मागील आठवड्यात पत्रकार परिषद ...
कोल्हे गटाचे नगरसेवक तसेच काही नेत्यांनी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांची सहमती एक्स्प्रेस ही सुसाट सुटली असल्याचे मागील आठवड्यात पत्रकार परिषद घेत म्हटले होते. त्यावर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शनिवारी त्यांच्या दालनात पत्रकार परिषद घेउन त्याचा समाचार घेतला.
वहाडणे म्हणाले, नगर परिषदेमध्ये मंगळवारी (दि. १२) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत कामांच्या निविदा काढल्यानुसार १२ कामांची कागदपत्रांची पूर्तता झाली. तीच कामे स्थायी समितीच्या बैठकीत ठेवण्यात आली होती. उर्वरित १७ कामांचे अपूर्ण असलेले कागदपत्र पूर्ण करण्यासाठी संबंधित ठेकेदारांशी पत्रव्यवहार केला होता. त्यांनी कागदपत्र पूर्ण केल्यानंतर तेही दुसऱ्या बैठकीमध्ये मंजुरीसाठी ठेवण्यात येणार होते. परंतु, कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी मी वारंवार कारण विचारूनही कोणतेही कारण न सांगता ही सर्व १२ कामे नामंजूर केली आहेत. विशेष म्हणजे कागदपत्र अपुरे असलेल्या कामांत सर्वाधिक कोल्हे गटाच्याच ठेकेदारांनी निविदा भरल्या आहेत. त्यांनीच हे कागदपत्र अपूर्ण ठेवले आहे.
............
त्यांचा उद्देश कधीच पूर्ण होणार नाही
वेळेत कागदपत्राची पूर्तता केली असती, तर सर्वच कामे मंजूर झाली असती. परंतु, काही दिवसांत हे पूर्ण होऊन याचे सर्व श्रेय हे नगराध्यक्षांना गेले असते. त्यामुळे आपल्या वतीच्या ठेकेदारांना पैसे देऊन हे टेंडर भरण्यास सांगितले. नगर परिषदेची आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मुद्दाम कामांना उशीर करायचा आणि निवडणुकीत नगराध्यक्षांनी काय कामे केली म्हणून अपप्रचार करण्याचा यांचा हेतू आहे. परंतु, आमची सहमती एक्स्प्रेस यांचे उद्दिष्ट कधीच पूर्ण होऊन देणार नाही, असेही वहाडणे शेवटी म्हणाले.
................
फोटो१६- विजय वहाडणे
160121\img_20210116_122657.jpg
कोपरगाव येथे पत्रकार परिषदेत बोलताना नगराध्यक्ष विजय वहाडणे.